15 December 2024 8:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

मुंबई धारावीत कोरोनाबाधितांचा आकडा ५५ वर, ७ रुग्णांचा मृत्यू

Covid19, Corona Crisis, Dharavi

मुंबई, १४ एप्रिल: मुंबईतील दाट लोकवस्ती असलेल्या धारावीमध्ये कोरोनाचा विळखा आणखी वाढत चालला आहे. धारावीत दिवसेंदिवस रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा वाढत चालला आहे. मंगळवारी धारावीत कोरोनाचे आणखी ६ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोनाबाधितांचा आकडा ५५ वर पोहचला आहे. तर मंगळवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे धारावीतील मृतांचा आकडा ७ झाला आहे, मुंबई महानगरपालिकेने ही माहिती दिली आहे.

धारावीत आज सापडलेल्या सात रुग्णांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. धारावीच्या कल्याणवाडीत एक ५२ वर्षाचा रुग्ण सापडला होता. त्याच्यावर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. ११ एप्रिल रोजी त्याचा मृत्यू झाला होता. आज त्याचा रिपोर्ट आला असता त्याचा मृत्यू करोनानेच झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर जनता सोसायटीत एक पुरुष आणि एका महिलेला, राजीव नगरमध्ये एका महिलेला आणि मुस्लिम नगरमध्ये एका पुरुषाला करोनाची लागण झाली आहे. मुस्लिम नगरमध्ये आणखी एक करोना रुग्ण सापडला असून त्याचा सायन रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. त्यामुळे धारावीतील करोना रुग्णांची संख्या ५५वर गेली आहे.

धारावीमधील मुकुंद नगरमध्ये नऊ, सोशल नगरमध्ये सहा, डॉ. बालिगा नगरमध्ये पाच, मुस्लीम नगर, जनता सोसायटीत प्रत्येकी पाच, शास्त्री नगरमध्ये चार, वैभव अपार्टमेंट, मदिना नगर, कल्याण वाडीत प्रत्येकी दोन, पीएमजीपी कॉलनी, धानवाडा चाळ, मुरुगन चाळ, राजीव गांधी चाळ, नेहरू चाळ, इंदिरा चाळ आणि गुलमोहम चाळ येथे प्रत्येकी एक करोनाबाधित रुग्ण सापडला आहे. डॉ. बालिगा नगरमधील दोघांचा, तर सोशल नगर, कल्याण वाडी, नेहरू चाळ येथील प्रत्येकी एक अशा पाच करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

 

News English Summary: In the dense population of Mumbai, Corona’s slopes continue to grow. The number of patients and the number of deaths is increasing day by day. Six more coronary artery patients were found on Tuesday. Therefore, the number of coronary arteries in Dharavi has reached 55. Two more died on Tuesday. As a result, the death toll in Dharavi has risen to 7, the Mumbai Municipality has given this information.

News English Title: Story Corona virus 6 more Covid 19 positives cases and 2 deaths related to virus reported in Dharavi Corona Crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x