27 July 2021 12:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

घरपोच दारुवर सकारात्मक निर्णयास उत्सुक तत्कालीन फडणवीस सरकारमधील नेते पवारांच्या त्या पत्रावर का नाराज? - सविस्तर

Devendra Fadnavis

मुंबई, १२ मे | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं. हॉटेल व्यावसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील काही प्रतिनिधींनी त्यांच्या समस्या मांडल्या होत्या, या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात आलं असल्याचं शरद पवारांनी सांगितलं होतं. दरम्यान शरद पवारांनी पाठवलेल्या या पत्रानंतर भाजपकडून टीका केली जात आहे. दरम्यान भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी शरद पवारांना यासंबंधी एक पत्र लिहिलं आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

अनिल बोंडे यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली असून पत्रातून नाराजी जाहीर केली आहे. केंद्रीय कृषीमंत्री राहलेल्या शरद पवारांनी शेतकरी, शेतमजुरांबद्दल पत्रामध्ये एकही शब्द लिहला नाही असा उल्लेख करत अनिल बोंडे यांनी खंत व्यक्त केली आहे.

यासंदर्भात भाजप नेते अनिल बोन्डे म्हणतात, पवार साहेब! मुख्यमंत्री फक्त तुमचचं ऐकतात. दारुवाल्यांसाठी तुम्ही कळकळीने पत्र लिहिले. दारुवाले तुम्हाला आशीर्वाद देतीलच. किंबहुना दारुवाल्यांच्या आशीर्वादावरच तुमची मदार असेल. परंतु, महाराष्ट्रातील 150 लाख शेतकरी कुटुंब अडचणीत आहेत. शेतमजूर सुद्धा सरकारकडे आशेने पाहत आहेत. बारा बलुतेदारांनाही जगण्यासाठी सरकारची मदतीची आवश्यकता आहे. या सर्वांजवळ दारुवाल्यांसारखी मालमत्ता नाही. या सर्व दुखीतांच्या पीडीतांच्या मदतीसाठी पवार साहेब मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहाना, असं चिमटा बोंडे यांनी या पत्रातून काढला आहे.

वास्तविक आज पवारांवर तोंडसुख घेणारे भाजप नेते याच दारू उद्योगावरून फडणवीस सरकारच्या काळात घेरलं गेलं होतं. ऑक्टोबर २०१८ मध्ये म्हणजे तत्कालीन उत्पादनशूल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये घरपोच दारूच्या निर्णयासाठी फडणवीस सरकार अनुकूल असल्याचे स्पष्ट केल्याने फडणवीस सरकारच्या अडचणी वाढल्या होत्या. ज्या पद्धतीने इ-कॉमर्स वेबसाइट इतर वस्तू घरपोच करतात. त्याच माध्यमातून दारुही घरपोच पुरवण्यात येईल, असे तत्कालीन उत्पादनशूल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले होते. युतीतील तत्कालीन सहकारी पक्ष शिवसेनेने देखील आपल्या संस्कृतीला चुकीचा पायंडा पडेल असं म्हटलं होतं.

तसेच नोव्हेंबर २०१५ मध्ये तत्कालीन भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्र लिहून दारू उद्योग राज्यातून हद्दपार करून एक सामाजिक क्रांती घडवावी असं पत्राद्वारे म्हटलं होतं. मात्र तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी तसं केल्यास राज्य सरकारला प्रति वर्षी तब्बल १८ हजार कोटीच्या महसुल गमवावा लागेल असं सांगत आर्थिक तोट्याचं कारण पुढे केलं होतं. वास्तविक पवारांच्या सध्याच्या पत्रात देखील आर्थिक नुकसान हाच संदर्भ होता. काही महिन्यापूर्वी स्वतः राज ठाकरे यांनी देखील हाच मुद्दा मुढे करत त्यामागील आर्थिक फटका बसण्याचं कारण देत सरकारला आवाहन केलं होतं. मात्र मागील इतिहास विसरून भाजप नेत्यांनी सध्या सुरु केलेला प्रकार हास्यास्पद म्हणावा लागेल.

 

News English Summary: Former Excise Minister Chandrasekhar Bavankule told the Times of India in an interview that the government was in favor of the decision, adding to the state government’s woes. The way e-commerce websites deliver other items. He had said that liquor would also be supplied at home through the same channel.

News English Title: BJP leader reaction over Sharad Pawar’s letter on aid to Hotel and wine industry during lockdown news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(650)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x