15 December 2024 12:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज
x

शिंदेंना उत्तर भारतीयांची अनधिकृत दुकानं फोडल्याचे ज्ञात, पण मराठी माणसाची डोकी फोडल्याचा विसर?

Shivsena, Uttar Bhartiya

नवी मुंबई : काळाच्या ओघात शिवसेना मराठी माणूस हा शिवसेनेसाठी केवळ मतांसाठी गृहीत धरलेला पारंपरिक मतदार झाला आहे. शिवसेनेचे ठाण्यातील आमदार तसेच मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा उत्तर भारतीय समाजाचे गोडवे गाण्यास सुरवात केली आहे. भाषणात मराठी माणसाचा एकही उच्चार न करता, त्यांनी केवळ उत्तर भारतीयांचे आणि शिवसेनेच्या अतूट नात्याचे दाखले नवी मुंबईतील आयोजित कार्यक्रमात दिले आहेत. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेनेने कधीही उत्तर भारतीय नागरिकांना त्रास दिला नाही.

दरम्यान, वाघाचे दाखले देणाऱ्या एकनाथ शिंदेंना थेट मनसे पक्षाचं नाव घेऊन भाषण करण्याची हिम्मत झाली नाही. त्यामुळे ते मनसेचा थेट नामोल्लेख टाळत म्हणाले की, ‘ठाण्यामध्ये एका पक्षाने उत्तर भारतीयांना खूप त्रास दिला, त्यांच्या गाड्या फोडल्या, त्यांच्या व्यवसायाची दुकाने तोडली, त्या वेळेस शिवसेना उत्तर भारतीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. त्यामुळे उत्तर भारतीय समाज शिवसेनेच्या बाजूने उभा असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना केले आहे.

पक्षाच्या मुंबई, ठाणे, मीरा भायंदर आणि नवी मुंबई शहरामधील उत्तर भारतीय मेळाव्यांमध्ये मंत्री एकनाथ शिंदे वारंवार थेट मनसेचं नाव न घेता उपस्थित उत्तर भारतीयांसमोर मतांचा जोगवा मागताना दिसत आहेत. यापूर्वी सुद्धा त्यांनी अशी वक्तव्य कांदिवलीतील ‘उत्तर भारतीय सन्मान’ मेळाव्यात केली होती आणि तिथे सुद्धा मनसेचा दाखला देत, उत्तर भारतीयांच्या सन्मानासाठी शिवसेना नेहमीच मैदानात असल्याचं सांगितलं होतं. तसाच प्रकार त्यांनी पुन्हा नवी मुंबईमध्ये केल्याचे पाहायला मिळाले. उत्तर भारतीयांची अनधिकृत दुकानं एका पक्षाने (मनसेने) फोडली याची आठवण ते उपस्थित उत्तर भारतीयांना करून देताना दिसले. परंतु, मुंबईमध्ये जेव्हा मराठी माणसाची डोकी ३०-३५ जणांच्या उत्तर भारतीय घोळक्याने लाठ्या-काठ्या मारून फोडलं गेलं, तेव्हा रक्त बंबाळ झालेला मराठी माणूस न बघता, केवळ तो प्रतिस्पर्धी पक्षाचा म्हणून बघ्याची भूमिका घेणारे शिवसेनेचे नेते आणि मराठी माणसाची डोकी भय्यांनी फोडल्याची समाज माध्यमांवर टिंगल टवाळी करण्यात धन्यता मानणारे शिवसैनिक सुद्धा त्याच भूमिकेत आजही दिसतात , हे राज्यातील मराठी माणसाचे दुर्दैव आणि मराठी माणसाचा भविष्यकाळ भीषण असल्याचं लक्षण,  तसेच आताच्या बदललेल्या शिवसेनेचं वास्तव म्हणावं लागेल.

नवी मुंबई येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, मंत्री एकनाथ शिंदे भाषणादरम्यान म्हणाले की, ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे अनेक नगरसेवक हे उत्तर भारतीय आहेत. अयोध्येत उद्धव ठाकरे यांनी रामजन्मभूमीचे दर्शन घेतले. त्यावेळी उत्तर भारतीयांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत प्रचंड आकर्षण, आस्था आणि श्रद्धा असल्याचे दिसले.

तसेच शिवसेनेची पंढरपूर येथील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जंगी सभा झाली. शिवसेना सत्तेत जरी सामील असली, तरी जेव्हा कधी जनतेचे प्रश्न येतात तेव्हा सत्ता, सरकार बाजूला ठेवून शिवसेना जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतःला झोकून देते असं एकनाथ शिंदे म्हणाले. त्यामुळेच नवी मुंबईतील दोन्ही विधानसभा मतदार संघासह ठाणे जिल्ह्यावर सुद्धा शिवसेनेचं निर्विवाद साम्राज्य आहे.

 

News English Summery: In the course of time, the Shiv Sena Marathi man has become the traditional voter for Shiv Sena. Shiv Sena MLA and Minister Eknath Shinde have again started singing the good songs of the North Indian community. Without giving a single Marathi word in the speech, he has given only the North Indians and the Shiv Sena’s incomparable relation in a program organized in Navi Mumbai. Addressing the gathering at the time, Eknath Shinde said that Shiv Sena has never harassed North Indian citizens. Meanwhile, Eknath Shinde, who gave the Tiger certificates, did not dare to speak directly with the name of the MNS party. So, avoiding the direct anonymity of the MNS, he said, ‘In Thane, a party upset the North Indians, smashed their trains, smashed their business shops. Therefore, the North Indian society stands in favor of Shiv Sena, Minister of Public Works and Guardian Minister of Thane district Eknath Shinde while addressing the attendees.

 

News English Title: Story Shivsena never remember Marathi Manus but just want Uttar Bharatiya for votes in Todays politics.

हॅशटॅग्स

#Ekanath Khadse(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x