25 September 2020 1:04 AM
अँप डाउनलोड

उत्तर भारतीयांच्या सन्मान रॅलीत सेनेचे मंत्री-आमदार-खासदार जातात, मग मराठी बेस्ट कामगारांसाठी?

shivsena, Uttar bharatiya, marathi manus

मुंबई : मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये उत्तर भारतीय समाज संकटात सापडताच मुंबई आणि ठाण्यात थेट ‘उत्तर भारतीय सन्मान मेळावे आणि मोर्चे’ आयोजित करणारा शिवसेना पक्ष बेस्टचा मराठी कामगार आणि त्यांचे कुटुंबीय रास्त मागण्यांसाठी संपावर गेल्यावर कुठे मग्न होता, असा प्रश्न मुंबईकरांना मागील ९ दिवसांपासून पडला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मुंबई आणि ठाण्यात ‘उत्तर भारतीयो के सन्मान में’ आणि ‘लाई चणा कार्यक्रम’ सऱ्हास पणे आयोजित करून आम्ही उत्तर भारतीयांच्या पाठीशी ठाम पणे उभे आहोत असा संदेशच देण्याचे प्रकार सुरु आहेत. तर दुसऱ्या बाजूला मुंबईतील बेस्ट उपक्रमात नोकरदार वर्ग असणारा मराठी कामगार आणि त्यांचे कुटुंबीय मागील ९ दिवसांपासून संपावर होते. परंतु, शिवसेनेने अक्षरशः कानाडोळा केल्याचे मुंबईकरांचे म्हणणे आहे. शिवसेनेने ना बेस्ट कामगारांचा विचार केला, ना सामान्य मुंबईकरांच्या अडचणीचा अशा प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या आहेत.

वास्तविक शिवसेनाच बेस्ट कामगारांचा गिरणी कामगार करू पहाते आहे असा थेट आरोप बेस्ट कामगारांनी केला आहे. मागील दोन वर्षांपासून शिवसेनेचे पक्षप्रमुख आम्हाला केवळ आश्वासनं देत असून, त्यासाठी त्यांनी काहीच विशेष प्रयत्न केलेले नाही असा कामगारांचा आरोप आहे. त्यामुळे परप्रातीयांसाठी रस्त्यावर उतरून त्यांचा सन्मान जपणाऱ्या शिवसेनेवरून सामान्य मराठी माणसाचा विश्वास उडत आहे असंच चित्र सध्या तयार होतं आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Shivsena(921)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x