28 May 2024 3:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

हि बाकी 'बेस्ट' बातमी; ८ दिवसांनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

मुंबई: बेस्ट कामगारांनी अखेर ८ दिवसांनंतर संप मागे घेण्याचा निर्णय घोषित केला आहे. सदर प्रकरणी मुंबई हायकोर्टाने आता मध्यस्थाची नेमणूक करण्याची सूचना केली आहे. दरम्यान, आजच्या सुनावणीत तासाभरात संप मागे घेत असल्याचे जाहीर करा, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. याला कामगार युनियनचे संबंधित नेते आणि वकिलांनी सुद्धा मान्यता दिली आहे. त्यानंतर पूढच्या काही तासाभरातच कर्मचारी युनियनकडून संप मागे घेत असल्याची घोषणा जाहीर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कोर्टाने अंतिम तडजोडीसाठी प्रशासनाला ३ महिन्यांची मुदत आखून दिली आहे. त्यानुसार बेस्ट कामगारांना जानेवारीपासून लागू होणारी १० टप्प्यांची वेतनवाढ ताबडतोब लागू करण्याचे आदेश कोर्टाने प्रशासनाला दिले आहेत. तसेच संपकरी कामगारांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असं आश्वासन बेस्ट प्रशासनाकडून कोर्टाला लेखी स्वरूपात देण्यात आलं आहे. यासोबतच एकाही कर्मचाऱ्याला सेवेतून कमी करणार नाही, कोणाचंही वेतन कापलं व रोखलं जाणार नाही, अशी लेखी आश्वासनं सुद्धा प्रशासनाकडून कोर्टाला देण्यात आली आहेत.

तसेच २० टप्प्यांमध्ये एकूण पगारवाढ द्या, BEST आणि तसेच मुबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाचं विलनीकरण करा, अशा मागण्या संपकरी कर्मचाऱ्यांनी उचलून धरल्या होत्या. या मागण्यांसाठी कोर्टाने मध्यस्थाची नेमणूक केली आहे. दरम्यान, नेमण्यात येणाऱ्या त्या मध्यस्ताच्या माध्यमातून ३ महिन्यात अंतिम तडजोड करा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात न्यायमूर्ती निशिता म्हात्रे यांचं नाव BEST युनियनकडून मध्यस्थ म्हणून सुचवण्यात आलं आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x