18 November 2019 12:22 AM
अँप डाउनलोड

कोस्टल रोड; नवा टेंडर नवी युक्ती? विरोध करणाऱ्या उच्चभ्रूंसोबत सेना खासदार-आमदार-नगरसेवकांचा लाडीगोडी मॉर्निंगवॉक'?

मुंबई : मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाचे काही दिवसांपूर्वीच उदघाटन करण्यात आले होते. दरम्यान, प्राथमिक कामांना सुरुवात झाल्याने सी-फेसच्या प्रॉमनेडवर बॅरिकेटिंग केल्याने मॉर्निंग वॉक, जॉगिंग, व्यायाम करायला येणाऱ्या उच्चभ्रू स्थानिक रहिवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ‘वरळी सी-फेसच्या जॉगर्स अँड वॉकर्स असोसिएशन’ आणि ‘लाफ्टर क्लब’च्या सदस्यांनी कोस्टल रोडच्या कामाला तीव्र विरोध दर्शविला आहे.

तसेच हा उच्चभ्रू लोकांनी वेढलेला परिसर असल्याने ते तितकेच कायदेशीर आडकाठी आणतील याची सत्ताधारी शिवसेनेला चुणूक लागली आहे. त्यामुळे कामात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतु तसे झाल्यास निवडणुकीच्या तोंडावर अनेक आर्थिक अडथळे निर्माण होतील याची कल्पना सत्ताधाऱ्यांना आली आहे असं म्हणावं लागेल. कारण संपूर्ण ५ वर्षात तोंड न दाखवणारे शिवसेनेचे स्थानिक खासदार, आमदार आणि नगरसेवक आता चक्क सकाळी ६ वाजल्यापासून वरळी सीफेसवर मॉर्निंगवॉक’ला जाणार आहेत. अर्थात वरून आदेश असल्याशिवाय तर खासदार, आमदार आणि नगरसेवक एकत्र मोहिमेवर निघणे शक्य नाही.

कारण, शिवसेनेचे स्थानिक खासदार-आमदार-नगरसेवक आता सकाळी ६ वाजल्यापासून मॉर्निंगवॉक’च्या वेळी येणाऱ्या स्थानिक उच्चभ्रू लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत पालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी जे सरकारी कार्यालय उघडल्यानंतर सुद्धा उपलब्ध असतील याची शाश्वती देता येत नाही, ते वरिष्ठ अधिकारी सुद्धा आता सामान्यांना त्यांच्यासोबत भेटणार आहे असे वृत्त आहे. विशेष म्हणजे असा याच प्रकल्पामुळे उद्धवस्त होण्याच्या दिशेने असणाऱ्या कोळी समाजासाठी कोणताही मॉर्निंगवॉक या नेत्यांना घ्यावासा वाटला नाही. कारण ते वकील उभे करणार नाहीत. केवळ स्थानिक नेत्यांना पकडा आणि त्यांना आमिष दाखवा हे ठरलेले प्रयोग. त्यामुळे तत्पर झालेले हे सत्ताधाऱ्यांचे खासदार, आमदार आणि नगरसेवक किती यशस्वी होतात ते पाहावं लागणार आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(741)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या