12 October 2024 3:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Login | पगारदारांनो, तुम्ही गरजेच्या वेळी EPF मधून पैसे काढता, नवा नियम लक्षात घ्या, होतं खूप मोठं नुकसान - Marathi News Post Office Scheme | महिलांनो पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवा आणि 32,000 रुपयांपर्यंत व्याज मिळवा, जाणून घ्या योजनेविषयी Post Office Interest Rate | पोस्ट ऑफीसची खास योजना, बचतीवर व्याजानेच कमवाल 2 लाख रुपये, फायदाच फायदा - Marathi News Credit Card | क्रेडिट कार्ड घेण्याआधी स्वतःला विचारा हे प्रश्न, नुकसान होणार नाही आणि मिळतील अनेक फायदे - Marathi News EPFO Passbook | पगारातून EPF चे पैसे कापले जातात, असा घ्या फायदा, EPF खात्यात जमा होतील 3 ते 5 करोड - Marathi News Shukra Rashi Parivartan | शुक्र राशी परिवर्तन, या 6 राशींच्या लोकांचा गोल्डन टाईम सुरु होतोय, तुमची राशी कोणती - Marathi News Gold Rate Today | बापरे, दसऱ्याच्या एक दिवस आधी सोन्याचे भाव वाढले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर जाणून घ्या - Marathi News
x

Bonus Share News | झटक्यात कमाईची मोठी संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, फायदा घ्या

Bonus Share News

Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. इंडो कॉट्सपिन लिमिटेड कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 94.69 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( इंडो कॉट्सपिन लिमिटेड कंपनी अंश )

आज देखील हा स्टॉक जोरदार तेजीत वाढत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के आणि सहा महिन्यांत 120 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी इंडो कॉट्सपिन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के वाढीसह 95.13 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुकताच इंडो कॉट्सपिन लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 7:10 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. म्हणजेच ही कंपनी आपल्या पात्र शेअरधारकांना प्रत्येक 10 शेअर्ससाठी 7 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. बोनस शेअर्सची पात्रता निश्चित करण्यासाठी कंपनीने अद्याप रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही.

इंडो कॉट्सपिन ही कंपनी मुख्यतः विणलेले कापड, कार्पेट्स, फेल्ट्स, डिझायनर कार्पेट्स आणि जिओटेक्स्टाइलची प्रमुख निर्यातदार, उत्पादक, आयातदार, व्यापारी आणि पुरवठादार म्हणून व्यवसाय करते. या कंपनीची स्थापना 1955 साली झाली होती. जून 2024 तिमाहीत इंडो कॉट्सपिन लिमिटेड कंपनीचा महसूल 5.15 टक्के घसरून 3.07 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

जून 2023 च्या तिमाहीत कंपनीने 3.24 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. जून तिमाहीत इंडो कॉट्सपिन लिमिटेड कंपनीच्या नफ्यात 159.11 टक्के वाढ नोंदवली गेली होती. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा 0.04 कोटी रुपये होता. जून तिमाहीत कंपनीचा EBITDA 17.39 टक्के वाढला आहे. मागील वर्षीच्या जून तिमाहीत कंपनीचा EBITDA 0.23 कोटी रुपये होता. तर जून 2024 मध्ये हे प्रमाण 0.27 कोटी रुपयेवर पोहचले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Share News on Indo Cotspin Share Price NSE Live 14 August 2024.

हॅशटॅग्स

Bonus Share News(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x