22 November 2019 2:23 PM
अँप डाउनलोड

केजरीवाल सरकारचा अर्थसंकल्प 'आधुनिक शाळांचा' तर योगी सरकारचा 'गोशाळांचा'

लखनऊ : आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारचा तिसरा अर्थसंकल्प युपीच्या विधानसभेत सादर झाला. दरम्यान, लवकरच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने योगी सरकारची मोठी कसोटी लागणार होती आणि त्यामुळे त्याला महत्व प्राप्त झाले आहे. युपीचे अर्थमंत्री राजेश अग्रवाल यांनी विधानसभेत अर्थसंकल्प मांडला.

या अर्थसंकल्पात जनमानसातील सर्वच घटकांना दिलासा देण्याचा प्रयत्न यावेळी योगी सरकारकडून करण्यात आल्याचे दिसते. यूपीतील पर्यटन क्षेत्रात परिवर्तन आणण्यासाठी अतिरिक्त निधी देण्यात आला आहे. तसेच, अपेक्षेनुसार गोसंवर्धनावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. राज्यात गोशाळा व्यवस्थापनासाठी तब्बल २४८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. योगी सरकारने यावेळी ४ लाख ७० हजार ६८४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे.

यावेळी आदित्यनाथ यांनी सांगितले की, ‘यंदाचा अर्थसंकल्प सर्वात मोठा आहे. मागील अर्थसंकल्पाच्या तुलनेत ११.९८ टक्के अधिक आहे. मागील काही दशकांपूर्वी ज्या योजना अपूर्ण राहून गेल्या आहेत. त्या पूर्णत्वाला घेऊन जाण्याचं आम्ही निश्चित केलं आहे. त्याव्यतिरिक्त, सध्या आमच्या सरकारवर कर्जमाफीचा कोणताही दबाव नाही. त्यामुळे अधिक योजना चांगल्या प्रकारे लागू करण्यात येणार आहेत.’

हॅशटॅग्स

#Yogi Government(17)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या