11 December 2024 4:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
x

Goldiam International Share Price | 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 61 लाख परतावा, शेअर दिग्ग्ज गुंतवणूकदार खरेदी करत आहेत, स्टॉक डिटेल्स

Goldiam International Share Price

Goldiam International Share Price | ‘गोल्डियम इंटरनॅशनल’ या स्मॉलकॅप कंपनीत आणखी एका दिग्गज गुंतवणूकदारांनी पैसे लावले आहेत. भारतीय स्टॉक मार्केटमधील ट्रेडर आणि बिग बुल गुंतवणुकदार ‘आशिष कचोलिया’ यांनी डिसेंबर 2022 मधील तिमाहीत ‘गोल्डियम इंटरनॅशनल’ मधील 1 टक्के भाग भांडवल विकत घेतला आहे. या कंपनीत गुंतवणूक केल्यानंतर ‘गोल्डियम इंटरनॅशनल’ मध्ये पैसे लावणारे कचोलिया हे तिसरे मोठे गुंतवणूकदार आहेत. बुधवार दिनांक 14 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 2.59 टक्के वाढीसह 142.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Goldiam International Share Price | Goldiam International Stock Price | BSE 526729 | NSE GOLDIAM)

इतर दिग्गज गुंतवणुकदार :
भारतीय स्टॉक मार्केटमधील अनुभवी गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स ‘रमेश दमाणी’ आणि ‘मुकुल महावीर अग्रवाल’ हे गोल्डियम इंटरनॅशनलमध्ये पैसे लावणारे मोठे नाव आहे. हे दोघे प्रमुख सार्वजनिक शेअर धारकांमध्ये आधीपासूनच सामील आहेत. 31 डिसेंबर 2022 पर्यंत दमाणी यांच्याकडे ‘गोल्डियम इंटरनॅशनल’ कंपनीचा एकूण भाग भांडवल पैकी 1.58 टक्के वाटा होता. त्याच वेळी मुकुल महावीर अग्रवाल यांच्याकडे गोल्डियम इंटरनॅशनलमधील 2.75 टक्के भाग भांडवल वाटा आहे. या कंपनीमध्ये प्रवर्तकांकडे एकूण 66.39 टक्के भाग भांडवल आहे.

गोल्डियम इंटरनॅशनल शेअर्सची कामगिरी :
गोल्डियम इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्सनी मागील काही वर्षात आपल्या शेअर धारकांना बंपर परतावा कमावून दिला आहे. मुख्यतः जेम्स अँड ज्वेलरी व्यवसाय करणाऱ्या या कंपनीचे शेअर्स 13 मार्च 2009 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज इंडेक्सवर 2.26 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 10 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 138.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 6065 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 13 मार्च 2009 रोजी गोल्डियम इंटरनॅशनल शेअर्सवर 1 लाख रुपये लावले असते, आणि शेअर्स आतपर्यंत होल्ड करून ठेवले असते तर, सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 61.46 लाख रुपये झाले असते.

आशिष कचोलिया यांचा पोर्टफोलिओ :
ताज्या कॉर्पोरेट शेअर होल्डिंग डेटानुसार दिग्गज गुंतवणुकदार ‘आशिष कचोलिया यांच्या पोर्टफोलिओमध्ये एकूण 43 कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. त्यांची एकूण संपत्ती 1877 कोटी रुपये आहे, ज्यात शेअर बाजारच्या वाढीनुसार अधिक वृध्दी होत आहे. गोल्डियम इंटरनॅशनल कंपनी व्यतिरिक्त आशिष कचोलिया यांनी यशो इंडस्ट्रीज, राघव प्रोडक्टिव्हिटी एन्हांसर्स, युनायटेड ड्रिलिंग टूल्स, एक्सप्रो इंडिया, फिनोटेक्स केमिकल, अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन, सस्तसुंदर व्हेंचर्स, वैभव ग्लोबल अशा अनेक स्मॉलकॅप कंपन्यांमध्येही पैसे लावले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Goldiam International Share Price 526729 GOLDIAM check details on 11 January 2023.

हॅशटॅग्स

Goldiam International Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x