21 March 2023 1:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rail Vikas Nigam Share Price | या सरकारी कंपनीचा शेअर 65 रुपयांचा, शेअर्स खूप तेजीत, हा स्टॉकची खरेदी वाढण्याचं कारण? Godawari Power and ISPAT Share Price | ही कंपनी शेअर बायबॅक करणार, रेकॉर्ड तारीख आणि बायबॅक दर पाहून पैसे लावा Viral Video | काळजाचा ठोका चुकला! सिनेमाप्रमाणे घडलं, ती समुद्रात उडी मारणार इतक्यात टायगर शार्क आला आणि...? Children Mobile Addiction | मोबाइलचे व्यसन मुलांसाठी खूप धोकादायक, फॉलो करा या टिप्स, मुले स्वत: सोडून देतील मोबाईल Smart Metering Transition | उन्हाळ्यात वीज बिल कमी होईल, केंद्र सरकारने सांगितली पद्धत, त्यासाठी हे आजच करा SBI Bank Account Alert | एबीआय बँक ग्राहकांना महत्वाचा अलर्ट, तुमच्या खात्यातूनही पैसे कापले गेले असतील पहा, किती रक्कम? IRCTC Railway Confirm Ticket | कन्फर्म तिकीटाशिवाय ट्रेनमध्ये प्रवास कसा करावा? अडचणीच्या वेळी हा नियम लक्षात ठेवा
x

Stock To Buy | टाटा के साथ नो घाटा! हा शेअर देईल 21 टक्के परतावा, हा स्टॉक खूप स्वस्त मिळतोय, खरेदी करणार?

Stock to buy

Stock To Buy | आपल्या सर्वांची इच्छा असते की शेअर बाजारात एखाद्या चांगल्या शेअरमध्ये गुंतवणूक करावी आणि भरघोस परतावा कमवावा. जर तुम्हाला ही शेअर्समध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करायची असेल, तर तुम्ही टाटा समूहाचा भाग असलेल्या इंडियन हॉटेल्स या कंपनीच्या शेअर्समध्ये बिनधास्त गुंतवणूक करू शकता. ICICI Direct फर्मने इंडियन हॉटेल्स या कंपनीच्या शेअर्सवर बाय रेटिंग दिली असून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकसाठी 380 रुपये ही लक्ष्य किंमत निश्चित करण्यात आली आहे. तज्ञांचा अंदाज आहे की, काही दिवसात हा इंडियन हॉटेल्स कंपनीचा स्टॉक 21 टक्के पेक्षा अधिक वाढू शकतो.

2020 मध्ये कोरोना महामारीमुळे जगभर लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. हा कोरोना संक्रमण सुरू झाल्यापासून पर्यटन उद्योग ठप्प झाला होता. भारत आणि जगात टूर अँड ट्रॅव्हल्सचा उद्योग करणाऱ्या कंपन्यांना मोठा फटका बसला होता. आता सर्व काही सामान्य होत असून टूर आणि ट्रॅव्हल उद्योग पूर्वीसारखा तेजीत येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

उत्पन्नात 69 टक्के वाढ
इंडियन हॉटेल्स कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत उत्कृष्ट महसूल संकलित केला आहे. इंडियन हॉटेल्स कंपनीचे मार्जिन आणि नफा ब्रोकरेज फर्मच्या अंदाजापेक्षा फार कमी नोंदवले गेले आहे. आयसीआयसीआय डायरेक्ट फर्मने म्हटले आहे की, तिमाही निकालात इंडियन हॉटेल्स कंपनीच्या उत्पन्नात 69 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. वार्षिक आधारावर 2022 मधील सप्टेंबर तिमाहीत इंडियन हॉटेल्स कंपनीने 1232 कोटी रुपयांचा महसूल संकलित केला होता. कोरोना महामारीपूर्वीची महसूल आकडेवारी पाहिली तर आपल्याला समजेल की त्या तुलनेत या तिमाहीत 22 टक्क्यांची अधिक वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे इंडियन हॉटेल्स कंपनीचे EBITDA मार्जिन 800 बेसिस पॉइंट्सने वधारले आहे.

कोरोना संकटापूर्वी इंडियन हॉटेल्स कंपनीचे उत्पन्न सध्याच्या तुलनेत 24 टक्क्यांनी कमी होते. कोरोना नंतर आता कंपनीचे उत्पन्न 24 टक्क्यांनी वाढले आहे. इंडियन हॉटेल्स कंपनीच्या EBITDA मार्जिनमध्ये तिमाही आधारावर किंचित घट पाहायला मिळाली आहे. ब्रोकरेज फर्मने जाहीर केलेले आकडे अपेक्षेपेक्षा कमी असूनही इंडियन हॉटेल्स कंपनीचे मार्जिन मागील 10 वर्षांमध्ये सर्वोत्तम स्तरावर पोहोचले आहेत. या कारणास्तव ICICI डायरेक्ट फर्मने आपल्या ग्राहकांना इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स पोर्टफोलिओमध्ये जोडण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Indian Hotels Stock to buy recommended by ICICI securities firm for huge returns in future on 14 November 2022.

 

हॅशटॅग्स

#Stock To BUY(220)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x