14 November 2019 1:15 PM
अँप डाउनलोड

भाजपच्या जाहीरनाम्यात बांग्लादेशच्या दंगलींची छायाचित्रे, प. बंगाल पंचायत निवडणुक

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालचे भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांनी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. तसेच आगामी पंचायत निवडणुकीत भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास येण्यासाठी धडपडत आहे.

परंतु भाजपच्या जाहीरनाम्यामुळे पश्चिम बंगालमध्ये वादंग उठण्याची शक्यता आहे. कारण आगामी पंचायत निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात चक्क बांगलादेशच्या दंगलीची छायाचित्रे छापली आहेत. प्रसारमाध्यमांच्या अहवालांनुसार, भाजपच्या जाहीरनाम्यानुसार जी छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात अली आहेत ती २०१३ मध्ये ढाक्यात म्हणजे बांगलादेशात घडलेल्या दंगलीची आहेत. बांगलादेशातील दंगलीची छायाचित्र जाहीरनाम्यात छापून पश्चिम बंगाल मधील भाजप पक्ष तिथंली कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती दाखविण्याचा प्रयत्नं करत आहे. एखादं दुसरा अपवाद सोडल्यास इतर सर्व छायाचित्रं ही बांगलादेशातील दंगलीची छापण्यात आली आहेत.

विरोधी पक्षाच्या ते लक्षात येताच त्यांनी भाजपवर सडकून टीका करण्यास सुरुवात केली आहे. तृणमूल काँग्रेसने भाजपला चांगलेच धारेवर धरले असून भाजप इथल्या जनतेची दिशाभूल करण्यासाठीच हे करत असल्याचा आरोप केला आहे.

विरोधी पक्षाच्या टीकेला उत्तर देताना भाजप कडून दिलीप घोष म्हणाले की, सध्या पश्चिम बंगालमध्ये काय परिस्थिती आहे, हे आम्हाला दाखवायचे आहे. इतकंच नाही तर भाजपने असं सुद्धा स्पष्टीकरण दिल आहे की, बांगलादेशातील दंगलीच्या छायाचित्रात प्रमाणे जे घडलं होत, तसेच इथे सुद्धा हिंदूं देव देवतांचे पुतळ्यांच्या विटंबना करण्यात आल्या होत्या हे दाखविण्यासाठीच आम्ही हे छापल असल्याचा दावा केला आहे.

एकूणच निवडणूक जिंकण्यासाठी भाजप काय युक्त्या लढवेल याचा काहीच नेम राहिलेला नाही असच काहीस चित्र आहे.

हॅशटॅग्स

#Amit Shah(175)#Narendra Modi(1036)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या