अहमदनगर : अहमदनगरमधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण नगर जिल्ह्यात आणि राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिहारपेक्षा वाईट असल्याचा आरोप करत महाराष्ट्राला स्वतंत्र आणि पूर्णवेळ गृहमंत्री हवा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केलीय.

शिवसेना पक्षप्रमुख सध्या अहमदनगरच्या दौऱ्यावर असून त्यांनी ज्या दोन कुटुंबीयावर संकट कोसळलेय त्यांची जबाबदारी ही शिवसेनेची आहे असं सांगितलं. हत्या झालेल्या शिवसैनिकांच्या कुटुंबीयांची उद्धव ठाकरे यांनी भेट घेऊन त्यांच सांत्वन केलं आहे. तसेच पत्रकारांशी बोलताना त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवरून फडणवीस सरकारवर सुद्धा निशाणा साधला.

तसेच हत्या करणारे आरोपी अजून मोकाट असून जलद गतीने खटला चालवावा तसेच खटला लढण्यासाठी विशेष सरकारी उज्ज्वल निकम यांची नियुक्त करावी अशी मागणी त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

uddhav thackerays criticism of chief minister devendra fadnavis on law and order