2 May 2024 3:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

गलवान खोऱ्यातील नदीच्या पुरातून सहकाऱ्यांना वाचविताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

Indian Army, Jawan Sachin Vikram More, shahid, Galwan Valley

मालेगाव, २५ जून : पूर्व लडाखच्या सीमेवरुन भारत-चीनमध्ये संघर्ष वाढल्याने तणावात भर पडली. गलवान खोऱ्यात चीन सैन्यांकडून हिंसक झडप घालण्यात आली होती. यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. दरम्यान, गलवान खोऱ्यामध्ये नदीवरील पुलाचे काम सुरु असताना दोन जवानांना पुरातून वाचविताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आले आहे.

भारत-चीन सीमेवर तणाव सुरु असलेल्या गलवान घाटीमध्ये कर्तव्य बजावत असतांना मालेगाव तालुक्यातील साकुरी येथील सचिन विक्रम मोरे या जवानाला वीरमरण आले. या वृत्तानंतर साकुरी गावात शोककळा पसरली आहे. गलवान खोऱ्यामध्ये नदीवरील पुलाचे काम सुरु असताना अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात भारतीय लष्करातील दोन जवान पाण्यात पडले. ते वाहून जात असताना त्यांना वाचविण्याच्या प्रयत्न जवान सचिन मोरे यांनी प्रयत्न केला. मात्र, जवान सचिन मोरे यांनाही वीरमरण आल्याची घटना काल घडली.

दरम्यान, पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी, सैन्य मागे घेण्यासाठी भारत आणि चीन दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि मुत्सद्दी पातळीवर चर्चा सुरु आहे. पण त्याचवेळी चीनने गलवान खोऱ्यातील संघर्ष झालेल्या ठिकाणी पुन्हा बांधकाम केले आहे. सॅटलाइट फोटोवरुन चीनने संघर्ष झालेल्या भागात पुन्हा बांधकाम केल्याचे स्पष्ट दिसत आहे.

मागच्या आठवडयात १५ जूनच्या रात्री पेट्रोलिंग पॉईंट १४ जवळ चीनने टेहळणी चौकी उभारल्याने मोठा संघर्ष झाला होता. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनने ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाले होते. चीन आता चर्चेच्या माध्यमातून वाद सोडवण्यात आपल्याला रस आहे असे दाखवतोय, पण प्रत्यक्षात नियंत्रण रेषेवरील त्यांचा आक्रमक पवित्रा अजूनही कायम आहे. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले आहे.

 

News English Summary: Sachin Vikram More, a soldier from Sakuri in Malegaon taluka, died while on duty in the tense Galwan Valley on the Indo-China border. Mourning has spread in Sakuri village after this news.

News English Title: Indian Army Jawan Soldeir Sachin Vikram More shasid at Galwan Valley on the Indo China border News Latest Updates.

हॅशटॅग्स

#IndianArmy(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x