25 April 2024 10:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

तुम्ही मला मत द्या, मी तुम्हाला लस... काय भयंकर कुटिलपणा

BJP leader Shashi Tharoor, Corona vaccine, Bihar Assembly election 2020, BJP manifesto

नवी दिल्ली, २२ ऑक्टोबर : बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपाने आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. इतर अनेक आश्वासनांपैकी यंदा भाजपाने करोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील जनतेला करोनाचा मोफत लस देण्यात येईल असं आश्वासनही आपल्या जाहीरमान्यात दिलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज साडे दहाच्या सुमारास बिहार निवडणुकीसाठी भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.

या जाहीरनाम्यात भाजपाने ११ मोठे संकल्प केले आणि सत्तेत आल्यानंतर अनेक आश्वासने पूर्ण करण्याचा दावा केला. “भाजपा है तो भरोसा है’ ५ सूत्रे, एक लक्ष्य, ११ संकल्प’ यासह भाजपाने नवीन नाराही दिला आहे. पाटण्यात जाहीरनामा जाहीर केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण, भाजप नेते भूपेंद्र यादव आणि इतर नेत्यांनी पत्रकार परिषदेत भाषण केले. निर्मला सीतारामन यांनी माध्यमांना सांगितले की, कोरोना लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत मास्क हाच उपाय आहे. परंतु ही लस येताच ती मोठ्या प्रमाणात भारतात तयार होईल. ही लस बिहारच्या लोकांना मोफत दिली जाईल असं आश्वासन भाजपानं दिलं आहे.

त्यामुळे विरोधी पक्षांनी भाजपाच्या या आश्वासनावर निशाणा साधला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनीही या आश्वासनावरून भाजपावर हल्लाबोल केला आहे. शशी थरूर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. “तुम्ही मला मत द्या, मी तुम्हाला लस… काय भयंकर कुटिलपणा! निवडणूक आयोग त्यांना आणि त्यांच्या काठावर लटकणाऱ्या निर्लज्ज सरकारला रोखणार का?” असे ट्विट शशी थरून यांनी केले आहे.

 

News English Summary: The Bharatiya Janata Party on Thursday released its manifesto for the Assembly polls in Bihar with the first promise in it being free distribution of vaccine against COVID-19 once it is approved by the Indian Council of Medical Research (ICMR). Finance Minister Nirmala Sitharaman who released the manifesto in Patna said, “As soon as COVID-19 vaccine is available for production on a mass scale, every person in Bihar will get free vaccination. This is the first promise mentioned in our poll manifesto.”

News English Title: Bihar Assembly election 2020 BJP leader Shashi Tharoor over corona vaccine subject in BJP manifesto News updates.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x