27 July 2024 11:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात दर महिना रु.20,050 येतील, महिना खर्चाची चिंता मिटेल Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा
x

एकनाथ शिंदेंनी बंडखोर आमदारांना या 'गेम प्लॅन' पासून ठेवलंय अंधारात | शिंदे आणि भाजपचा गेम प्लॅन बाहेर येतोय

Enkath Shinde

Eknath Shinde | विधान परिषदेच्या निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २१ जून रोजी एकनाथ शिंदे यांनी बंड केले. या बंडखोरीमुळे राज्यात आणि महाविकास आघाडीत प्रचंड उलथापालथ झाली आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहोत, असे सांगून एकनाथ शिंदे गट बाहेर पडला असल्याने सरकार तसेच शिवसेना पक्ष वाचवण्याचे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. हिंदुत्वासाठी आम्ही पुढे आलो आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेविरोधात असाच सामना रंगला आहे. दीपक केसरकर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना, अ’शा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सन्मानपूर्वक राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. दुसरीकडे बंडखोर आमदारांना सांभाळताना आणि त्यांचा विचार नकारात्मक होऊ नये म्हणून प्रचंड कसरत करावी लागत आहे असं वृत्त आहे.

बंडखोर आमदारांची मनस्थिती ढळू नये म्हणून…
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे पक्ष सोडून गेलेल्या आमदारांशी चर्चा करण्यासाठी दररोज आमदारांची बैठक घेतात, असे गुवाहाटीच्या एका आमदाराने प्रसार माध्यमांना सांगितले. आमदारांची मानसिक स्थिती बिघडू नये, त्यांच्यामध्ये नकारात्मक भावना निर्माण होऊ नये यासाठी त्यांचे राजकीय भवितव्य कसे सुरक्षित आहे, याचा दाखलाही या बैठकांमधून त्यांना वेळोवेळी द्यावा लागत आहे. मात्र ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपासून ते फडणवीस यांच्यासोबत होणाऱ्या चर्चेत कोणालाही सहभागी करत नसल्याने एक दुसराच राजकीय कट आधीच शिजला असून त्यात शिंदे सोडून सर्व आमदारांना अंधारात ठेवण्यात आल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. यामध्ये सर्व आमदारांना अंधारात ठेवण्यात आलं आहे आणि त्यात या अनेक आमदारांचा राजकीय बळी जाणार हे समजतंय.

घटनेनुसार शिंदेंना इतर पक्षात विलीन व्हावंच लागणार :
शिंदे दोन तृतीयांश घेवून बाहेर पडले तर त्यांना घटनेतील तरतुदीनुसार आणि कायद्याने इतर पक्षात मर्ज करावे लागेल. तसेच शिंदे गटाला शिवसेना नाव घेता येणार नाही हे अनेक घटना तज्ज्ञांनी अत्यंत स्पस्ट केले आहे. दुसऱ्या बाजूला बंडखोर आमदार हे शिवसेना नाव आणि धनुष्यबाणा शिवाय निवडून येणे अशक्य आहे आणि हे त्यांनाही माहिती आहे. मात्र या आमदारांना राज्यात सरकार स्थापन होई पर्यंत खिळवून ठेवण्याचे आदेश भाजपने एकनाथ शिंदेंना दिलेलं आहेत. एकनाथ शिंदे हे बंडखोर शिवसेना आमदारांना भाजपच्या सांगण्यावर खोटं सांगत असल्याचं खात्रीलायक वृत्त भाजपच्या गोटातून नाव न सांगण्याच्या अटीवर प्राप्त झालं आहे.

भाजपचा नेमका गेलं प्लॅन काय :
सुप्रीम कोर्टाच्या ११ जुलैच्या सुनावणीपर्यंत अपक्ष आमदारांना पुढे करून त्यांच्यामार्फत अविश्वास ठराव पुढे करायचा. शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात आधीच आपल्या गटाचा महाविकास आघाडीला पाठिंबा नसल्याचं म्हटलं आहे आणि त्यानंतर केवळ एकनाथ शिंदे एकटे पॅरामिलिटरी फोर्सेसच्या संरक्षणात मुंबईत येतील आणि राज्यपालांना गटप्रमुख म्हणून महाविकास आघाडीचा पाठिंबा काढल्याचं आणि भाजपाला पाठिंबा असल्याचं पत्र देऊन कळवतील आणि पुन्हा गुवाहाटीला जातील. त्यानंतर राज्यपाल बहुमत चाचणीसाठी पुढाकार घेतील. त्यानंतर फडणवीस केवळ सध्या त्यांच्याकडे असलेल्या भाजप आणि अपक्ष आमदारांचा १३८ चा आकडा पुढे करून आपल्याकडे अधिक आमदारांचं समर्थन असल्याचं राज्यपालांना सांगतील. आणि महाविकास आघाडीला बहुमतासाठी विचारलं जाईल, मात्र तोपर्यंत शिंदे गटाला तटस्थ राहण्यास सांगण्यात येईल. त्यानंतर फ्लोरटेस्टपूर्वी लगेचच शिंदेंचा गट इतर पक्षात सामील करण्यासाठी हालचाली करण्यात येतील.

मात्र हा बंडखोर आमदारांना मोठा धक्का असेल. यासाठीच एकनाथ शिंदेंनी प्रवक्तेपदी मूळचे शिवसैनिक नसलेले आणि बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर शिवसेनेत आलेले दीपक केसरकर यांना प्रवक्तेपदी नेमले आहे. ते मूळचे राष्ट्रवादीतील असल्याने ते कुठेही गेले तरी त्यांची हरकत नसेल.

हा गट मूळ शिवसेना नसले :
हा गट मूळ शिवसेना नसले. मूळ शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह हे उद्धव ठाकरेंकडे असेल. या शिंदे गटाचं घाईत मर्जर करून त्यानंतर याच गटातील एक-एक आमदार पुन्हा भाजपात आणण्याचा घाट घालण्यात आला आहे. मात्र हा प्लॅन मर्जर होणाऱ्या पक्षाला आणि बंडखोर आमदाराना मोठा धक्का असेल. कोणीही विरोधात जाणार नाही, कारण याच गटाच्या पाठिंब्यावर त्यावेळी केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता असेल. खऱ्या अर्थाने बंडखोर आमदारांना पुढे मोठे धक्के राजकीय धक्के बसणार आहेत. हे धक्के देणारे दुसरे तिसरे कोणी नव्हे तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं संगनमत असेल, असं भाजपच्या गोटातून समजलं आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Enkath Shinde and BJP plan will exposed in few days check details.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x