7 August 2020 8:40 AM
अँप डाउनलोड

युती तुटली! शिवसेना ‘एनडीए’बाहेर; भाजपाकडून अधिकृत घोषणा

Shivsena, BJP, NDA, Union Minister pralhad joshi

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवरून भारतीय जनता पक्षासोबत काडीमोड घेतलेली शिवसेना आता एनडीएतून बाहेर पडली आहे. संसदेतील दोन्ही सभागृहांत म्हणजेच, लोकसभा आणि राज्यसभेत शिवसेनेचे खासदार विरोधी पक्षात बसणार आहेत. ते विरोधी पक्षांच्या बाकावर बसतील, अशी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज प्रसारमाध्यमांना दिली.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत असताना मुख्यमंत्रीपदावरून युती फिस्कटली. मुख्यमंत्रीपद हवच अस सांगत शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाला दूर सारत राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मदतीनं मोर्चे बांधणी सुरू केली आहे. सत्तास्थापनेसंदर्भात तिन्ही पक्षातील बोलणी अंतिम टप्प्यात आली आहेत.

लोकसभेत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत आहे मात्र राज्यसभेत भारतीय जनता पक्षाला इतर पक्षांची मदतीची गरज असते. त्यामुळे शिवसेनेचा विरोध भाजपासाठी कठीण जाणार आहे. सर्वपक्षीय बैठकीसाठी गटनेते विनायक राऊत सहभागी झाले होते. शिवसेनेच्या लोकसभेतील खासदारांची संख्या १८ आहे. एनडीएतील दोन नंबरचा पक्ष आहे. त्यामुळे शिवसेनेचा विरोध सरकारसाठी डोकेदुखी ठरु शकतो.

आम्हाला ट्विटरवर फॉलो करा:

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(470)#Shivsena(897)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x