4 August 2020 2:08 PM
अँप डाउनलोड

शिवसेनेला कुणीही शहाणपणा शिकवण्याची गरज नाही: संजय राऊत

Balasaheb Thackeray, Uddhav Thackeray, Shivsena, MP Sanjay Raut

मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांना ट्विटरवरून आदरांजली वाहिली आहे. ‘स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र आदरणीय बाळासाहेबांनी आपल्या सर्वांना दिला!’ असं म्हणत फडणवीस यांनी व्हिडिओ ट्विट करुन आदरांजली वाहिली आहे. स्वाभिमान आणि हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. शिवसेनेला कुणीही शहाणपणा शिकवण्याची गरज नाही’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

स्वाभिमान आणि हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांना थेट प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. शिवसेनेला कुणीही शहाणपणा शिकवण्याची गरज नाही,” अशी टीका राऊत यांनी केली आहे.

दरम्यान,उद्या पासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असून, खासदार असलेले शिवसेना नेते संजय राऊत अधिवेशनासाठी दिल्लीला रवाना होतील. मात्र, दरम्यानच्या काळात राऊत हे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन राज्यातील सत्तास्थापनेबाबत चर्चा करतील असे सांगितले जात आहे. राऊत हे उद्धव ठाकरे यांची भूमिका कांग्रेसच्या नेत्यापुढे मांडतील अशी सूत्रांची माहिती आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(108)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x