26 July 2021 1:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

काही लोक टीव्हीवर येण्यासाठी, बातम्या होण्यासाठी अशी वक्तव्य करतात - आ. रोहित पवार

NCP Rohit Pawar, BJP MLA Gopichand Padalkar, Sharad Pawar

मुंबई, २५ जून : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांबाबत धक्कादायक विधान केल्याने समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं होतं की, “शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे” असं माता त्यांनी व्यक्त केलं होतं. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, “गोपीचंद पडळकर ज्या पक्षातले आहेत त्या पक्षाचे महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस आहेत. वक्तव्य केल्यानंतर काही वेळानंतर त्यांच्याच नेत्यांनी त्यांना झापलं असं आम्हाला कळालं. गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या नेत्यांकडून शिकलं पाहिजे. त्यांच्या नेत्यांनी सांगितल्यावर आम्ही काय बोलणार. काही लोक टीव्हीवर येण्यासाठी, बातम्या होण्यासाठी अशी वक्तव्य करत असतात. ओघाच्या नादात आपण काय बोलतोय हे विसरुन जातात. ओघाच्या नादात त्यांच्याकडून चूक झाली असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे”.

 

News English Summary: Sharad Pawar’s grandson and MLA Rohit Pawar has reacted to Gopichand Padalkar’s statement. “Some people make such statements to get on TV, to be in the news,” he said.

News English Title: NCP Rohit Pawar On BJP MLA Gopichand Padalkar Over Statement On Sharad Pawar News Latest Updates.

हॅशटॅग्स

#RohitPawar(68)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x