7 May 2021 9:54 AM
अँप डाउनलोड

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनामुळे निधन

Congress MLA Raosaheb Antapurkar, passes away, Corona

मुंबई, १० एप्रिल: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बिलोली मतदार संघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे शनिवारी पहाटे मुंबईत निधन झाले. ते 63 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. काही दिवसांपूर्वीच रावसाहेब अंतारपूरकर यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर सातत्याने उपचार सुरु होते. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

प्राथमिक माहितीनुसार, साधारण 25 दिवसांपूर्वी रावसाहेब अंतापूरकर यांना कोरोनाची लागण झाली होती. सुरुवातीला काही दिवस त्यांच्यावर नांदेडच्या भगवती रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना मुंबईच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या 12 दिवसांपासून बॉम्बे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. रावसाहेब अंतापूरकर यांना मधूमेह आणि रक्तदाबाचा त्रास असल्याने त्यांच्या प्रकृतीत सातत्याने चढउतार पाहायला मिळत होते. दरम्यानच्या काळात त्यांना हृदयविकाराचा एक झटकाही येऊन गेला होता.

त्यांच्या निधनाची काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी ट्वीट करून माहिती दिली. “माझे निकटचे सहकारी व देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल येथे थोड्या वेळापूर्वी निधन झाले. आ. रावसाहेब अंतापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबियांना हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना,” अशी माहिती देत अशोक चव्हाण यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

 

News English Summary: Raosaheb Antapurkar, a senior Congress leader and MLA from Biloli constituency, passed away in Mumbai on Saturday morning. He was 63 years old. He is survived by his wife, two daughters, a son, son-in-law and grandchildren. A few days ago, Raosaheb Antarpurkar was infected with corona. Since then, he has been receiving continuous treatment. He finally passed away this morning.

News English Title: Congress MLA Raosaheb Antapurkar passes away due corona news updates.

हॅशटॅग्स

#Congress(487)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x