12 August 2020 12:25 PM
अँप डाउनलोड

मराठी माणसाच्या हक्कांसाठी जन्मलेली शिवसेना आज मराठी माणसाच्या विरोधात

रत्नागिरी : राज्यात बाळासाहेबांच्या नैत्रुत्वात मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी जन्माला आलेली शिवसेना आज केवळ मराठी माणसाच्याच विरोधात काम करत आहे. त्यात व्यवसाय करण्यासाठी पुढे येणा-या मराठी तरूणांच्या आड येण्याचे कारनामे सुद्धा सध्या शिवसेनेवाले करत आहेत. मग अशावेळी मराठी माणसांनी मूग गिळून गप्प बसायचे का? अशावेळी मराठी तरूण-तरुणींनी रोजगार कोणाकडे मागायचा? यापुढे आम्ही असे अजिबात होऊ देणार नाही असे माजी खासदार निलेश राणे म्हणाले.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

पुढे उपस्थित तरुणांना संबोधित करताना निलेश राणे म्हणाले की, मराठी तरूणांचे उद्योगधंदे नक्कीच वाढले पाहिजे. माझा मराठी तरूण हा आता उद्योगपती झाला पाहिजे आणि त्यासाठीच आमचे प्रयत्न राहणार असून, आम्ही माराही तरूणांच्या मागे ठामपणे उभे राहणार आहोत, असे प्रतिपादन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी उपस्थितांसमोर केले.

आज महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने रत्नागिरी येथे आयोजित केलेल्या युवक कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते. सध्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष संपूर्ण कोकणात लोकसभेसाठी जोमाने कामाला लागला असून, मोठ्या प्रमाणावर छोटेखानी सभांचे आयोजन करण्यात येत आहेत.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(55)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x