4 December 2022 6:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Weekly Horoscope | 5 ते 11 डिसेंबर | 12 राशींसाठी कसा राहील आगामी आठवडा, नशिबाची साथ कोणाला? Lakshmi Narayan Raj Yog | लक्ष्मी नारायण राजयोग उजळणार या राशींच्या लोकांचे भाग्य, प्रत्येक कामात यश मिळेल, तुमची राशी? एक 'सोंगाड्या' आहे जो सकाळी भगवा आणि दुपारी हिरवा असतो, मनसेच्या गजानन काळेंचा धार्मिक टोला कोणाला? Fast Money Share | हा शेअर एकदिवसात 20 टक्के वाढतोय, स्टॉक वाढीचे कारण काय? हा स्टॉक खरेदी करणार? Mutual Fund Calculator | 5000 ची SIP बनवते करोडपती, SIP गुंतवणुकीचे फायदे वाचा, पैसे गुणाकार गणित समजून घ्या Numerology Horoscope | 04 डिसेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Horoscope Today | 04 डिसेंबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

गेल्या २४ तासांत ५३३ पोलिसांना कोरोनाची लागण | ३ पोलिसांचा मृत्यू

Maharashtra Police, Mumbai Police

मुंबई, १० सप्टेंबर : कोरोनामुळे देशावर मोठं संकट ओढावलं आहे. देशात महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात आहे. यामध्येही मुंबई, पुणेसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. पण आता ग्रामीण महाराष्ट्रातही कोरोना डोकं वर काढत असल्याचं समोर येत आहे. सांगली, नागपूर आणि मराठवाड्यातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचं दिसंत. त्यामुळे राज्यासाठी ही चिंतेची बाब आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यात कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 979 कोरोना रुगणांची भर पडली आहे तर एका दिवसात कोरोनामुळे 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 735 वर गेला आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रातील 295 रुग्णाचा समावेश आहे. सांगली शहर 211 , मिरज शहर 84 रुग्ण आहेत. कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 8225 वर पोहचली असून उपचार घेणारे 383 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

महाराष्ट्र राज्यात गेल्या २४ तासांत ५३३ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ३ पोलिसांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या १८० झालीय. तर आतापर्यंत १७ हजार ९७२ पोलिस कोरोनाबाधित झालेत. त्यापैकी सध्या ३ हजार ५२३ पोलिस कोरोनावर उपचार घेत आहेत. तर १४ हजार २६९ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.

 

News English Summary: In the last 24 hours, 533 policemen have been infected with corona in Maharashtra. Three policemen have been killed by Corona. So far, the number of police deaths due to corona has risen to 180. So far 17 thousand 972 police have been corona.

News English Title: Last 24 hours 533 policemen have been infected with corona in Maharashtra Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x