15 December 2024 1:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
x

अखेर संभाजी बिडीचं नाव बदललं | नवं नाव समोर आलं

Sambhaji Bidi, Sable Bidi, Sambhaji Brigade

मुंबई, १९ जानेवारी: संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनानंतर संभाजी बिडी कंपनीने आपल्या उत्पादनात संभाजी हे नाव वगळत असल्याचे जाहीर केले होते. कोल्हापुरात संभाजी नावाने बिडी बंडल विकले जात होते. आपल्या संपूर्ण आयुष्यात कधी काडीलाही हात न लावलेल्या संभाजी महाराजांचे नाव बिडीला देणे ब्रिगेडला नेहमीच खटकत होते.

कोल्हापुरातून सुरू झालेल्या या आंदोलनाचे राज्यभर पडसाद उमटल्यानंतर साबळे वाघिरे आणि कंपनीच्या मुख्य संचालक मंडळाने हा निर्णय घेतला होता. त्याचा आनंदोत्सव संभाजी ब्रिगेडने कोल्हापुरात दुचाकी रॅली काढून, साखर वाटून साजरा केला होता.

मात्र नाव बदलण्यास थोडा वेळ लागेल असे कंपनीकडून सांगण्यात आले होते. आता कंपनीने बिडीचे नाव बदलले आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने विकली जाणारी बिडी आता ‘साबळे बिडी’ या नावाने विकली जाणार आहे. संभाजी ब्रिगेड, शिवधर्म फाऊंडेशन, इतर शिवप्रेमी संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जनभावनेचा आदर करुन आम्ही बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे साबळे वाघिरे आणि कंपनीचे संचालक संजय वाघिरे यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले होते.

 

News English Summary: The company has changed the name of the bidi. Therefore, the bidi sold under the name of Chhatrapati Sambhaji Maharaj will now be sold under the name ‘Sable bidi’. “We have decided to change the name of the bidi out of respect for the sentiments of Sambhaji Brigade, Shivdharma Foundation, other Shivpremi organizations and the general public,” Sable Waghire and Sanjay Waghire, director of the company, said in a statement.

News English Title: Sambhaji Bidi name changed as Sable Bidi news updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x