कर्जत : देशात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आल्यावर भारतीय जनता पक्षाचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मित मृत्यूची सखोल चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंतराव पाटील यांनी कर्जत येथील जाहीर सभेत केली. भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मित मृत्यूनंतर उलटसुलट चर्चा प्रसार माध्यमांमध्ये रंगली होती आणि त्यांची ईव्हीएममुळे हत्या झाली, असे हॅकरने म्हटल्यानंतर खळबळ उडाली होती.

भारतातील महत्वाच्या संस्थात्मक रचना मोडीत काढण्याचे काम सध्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केले असल्याचा घणाघात सुद्धा त्यांनी यावेळी उपस्थितांसमोर भाषणादरम्यान केला. दरम्यान, देशात स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी कर्जमाफी जर कुणी केली असेल तर तुमचे, माझे नेते शरद पवार साहेबांनीच असं ते म्हणाले. त्यावेळी जवळजवळ ७०,००० कोटी रुपयांची कर्जमाफी बळीराजाला देण्यात आली होती. परंतु सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी अजूनही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळालेली नाही, असे सुद्धा जयंत पाटील म्हणाले.

उद्या देशाचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. त्यादरम्यान निवडणूकपूर्व घोषणा होणार आहेत, आणि यापुर्वी देशात कुणीच काही दिलं नाही हे भासवलं जाणार आहे, हे लक्षात घ्या, असे थेट आवाहन सुद्धा यावेळी जयंत पाटील यांनी उपस्थितांना केले.

ncp leader jayant patil says we will inquire about the death of gopinath munde after coming in to power