27 April 2024 1:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

१२ आमदारांच्या नियुक्तींसदर्भात राज्यपालांवर अदृश्य दबाव - छगन भुजबळ

Minister Chhagan Bhujbal

नाशिक, १५ ऑगस्ट | आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारीवर दबाव असल्याचा आरोप केला आहे. याबाबत राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पत्रकारांनी विचारले असता, राज्यपालांचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. त्यामुळे ते सकारात्मक निर्णय घेतील. परंतू त्यांच्यावर अदृश्य दबाव असल्याचा टोला लगावत भुजबळांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

बारा आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीवरून उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर झालेल्या सुनावणी दरम्यान राज्यपालांनी घटनात्मक कर्तव्य लवकरात लवकर पार पाडावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. याबाबत छगन भुजबळांना विचारले असता ते म्हणाले, न्यायालयाने काय इशारा दिला आहे, हे समजून घ्यावे. मला वाटते राज्यपाल निश्चितपणे सकारात्मक विचार करतील. न्यायालयाने आदेश नव्हे निर्देश दिले आहेत. न्यायव्यवस्थेवर त्यांचा विश्वास आहे, त्यामुळे ते निश्चित सकारात्मक निर्णय घेतील, अशी आशा करू या, असेही ते म्हणाले.

उच्च न्यायालयाच्या सूचनेनंतर राज्यपाल अमित शहा यांच्या भेटीला:
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटीमागे राज्यातील विधान परिषदेच्या 12 जागा नियुक्तीची किनार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कारण शुक्रवारीच राज्याच्या विधानपरिषदेतील 12 नामनिर्देशित आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीबाबतच्या वादावरुन आपले मतं व्यक्त केले आहे. नामनिर्देशित जागा अनिश्चितकाळासाठी रिकाम्या ठेवता येणार नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तातडीने दिल्लीत शाह यांची भेट घेतली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Invisible pressure on governor regarding appointment of MLCa said Chhagan Bhujbal in Nashik news updates.

हॅशटॅग्स

#ChhaganBhujbal(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x