12 October 2024 7:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank FD Interest | 5 वर्षांसाठी केलेली FD 1 वर्षातच तोडायची असल्यास व्याज मिळेल की उलट पैसे कापले जातील No Cost EMI | नो कॉस्ट EMI खरंच फायद्याचा असतो, खरंच फ्री सुविधा मिळते का, असा असतो खेळ - Marathi News Nippon India Small Cap Fund | बापरे, महिना रु.10,000 SIP करा, ही योजना 1 कोटी 53 लाख रुपये परतावा देईल - Marathi News TCS Share Price | टाटा ग्रुपचा IT शेअर देणार मोठा परतावा, TCS स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TCS Manmauji Movie Release Date | एका तरुणासाठी स्त्रियांना झालंय प्रेमाचं लागीर, 'मनमौजी' सिनेमाची रिलीज डेट जाहीर IREDA Share Price | PSU IREDA शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | डिफेंस क्षेत्रातील शेअर रॉकेट तेजीत परतावा देणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO
x

आनंदराव अडसूळ यांचा पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा | शिंदे गटात गेल्यास राणा दाम्पत्याची राजकीय अडचण होणार?

Anandrao Adsul

Anandrao Adsul | शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आनंदराव अडसूळ यांचा राजीनामा हा माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का मानला जात आहे. आनंदराव अडसूळ हे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या वाटेवर असल्याची देखील चर्चा सुरू आहे.

राजीनाम्याचं पत्र पाठवलं :
आनंदराव अडसूळ यांनी उद्धव ठाकरे यांनी राजीनाम्याचं पत्र पाठवलं आहे. आजारपणात साधा फोनही नाही, तसेच अडचणीच्या काळात पक्ष नेतृत्त्व पाठीशी न राहिल्याच्या भावना आनंदराव अडसूळ यांनी राजीनामा पत्रातून बोलून दाखवल्या आहेत. ED ने केलेली कारवाई, त्याचबरोबर आजारपणात साधी विचारपूस देखील केली नाही, अशी खंत देखील अडसूळ यांनी व्यक्त केली आहे.

चिरंजिव अभिजीत अडसूळ हे शिंदे गटासोबत :
शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर आनंदराव अडसूळ यांनी प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया देणं टाळलं. मात्र, शिवसेना नेतृत्त्वावर त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं स्पष्ट झालं आहे. आता उद्धव ठाकरे हे अडसूळांच्या राजीनामा पत्रावर काय बोलतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आनंदराव अडसुळ यांचे चिरंजिव अभिजीत अडसूळ हे एकनाथ शिंदे गटासोबत आहे. त्यामुळे आनंदराव अडसूळ हे देखील शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी चौकशी :
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची अमरावतीच्या सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी ED कडून सध्या चौकशी सुरु आहे. व्यवहारात अनियमितता दिसून आल्यानं ED ने आनंदराव अडसूळ यांच्या घरी छापेमारी केली होती. त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला होता. परंतु, अचानक प्रकृती खालावल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तरी देखील ED च्या अधिकाऱ्यांनी त्यांचा पिच्छा सोडला नव्हता. ED अधिकारी तब्बल 14 तास हॉस्पिटलबाहेर तळ ठोकून होते.

जातीचा खोटा दाखला प्रकरण – नवनीत राणा यांच्या विरोधात न्यायालयात :
शिवसेनेचे अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा नवनीत राणा यांनी मागील लोकसभा निवडणुकीत पराभव केला होता. मात्र त्यानंतर आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात जातीचा खोट्या दाखल्याच्या आधारे निवडणूक लढवली असा आरोप करून त्याविरुद्ध थेट हायकोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर हायकोर्टाने नवनीत राणा यांना जोरदार धक्का दिला होता. त्यानंतर त्या सुप्रीम कोर्टात गेल्या आणि सध्या प्रकरण प्रलंबित आहे. मात्र राणा दाम्पत्याच्या राजकीय ‘हनुमान चालीसा’ नाट्यामागील खरं कारण हे शिवसेनेवर दबाव टाकणं हाच होता असं राजकीय तज्ज्ञ सांगतात. त्यासाठी त्यांनी भाजपची साथ घेऊन या प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध अँटी हिंदुत्वाचा अजेंडा राबवून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधला असं तज्ज्ञांचं मत आहे. मात्र आता अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ शिंदे गटात गेल्यास त्या नेमकं काय करणार ते पाहावं लागणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Anandrao Adsul resigned from Shivsena check details 07 July 2022.

हॅशटॅग्स

#Anandrao Adsul(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x