29 March 2024 4:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

राफेल डील मधील ते दलाल कोण? | आम्हाला सत्य समजू शकेल का? - प्रियांका चतुर्वेदी

Shivsena, MP Priyanka Chaturvedi, tweet, Rafael brokerage

मुंबई, ५ एप्रिल: राफेल लढाऊ विमान घोटाळा फ्रेंच मीडियामुळे पुन्हा जगभरात चर्चेत आले आहे. फ्रान्सच्या एका वेबसाइटने देसॉ एव्हिएशनकडून बोगस व्यवहार झाल्याचे म्हटले आहे. या मीडियाने फ्रान्सची भ्रष्टाचारविरोधी संस्था AFA दाखला देऊन रिपोर्ट जारी केला. कंपनीच्या 2017 च्या खात्यांचे ऑडिट करण्यात आले. त्यानुसार, 5 लाख 8 हजार 925 यूरो अर्थात जवळपास 4.39 कोटी रुपये क्लाइंट गिफ्टच्या नावे खर्च करण्यात आले आहेत. इतकी मोठी रक्कम गिफ्ट कशी असू शकते याचे अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. विमानाचे मॉडेल बनवणाऱ्या कंपनीचे केवळ मार्च 2017 चे एक बिल उपलब्ध करून देण्यात आले आहे.

AFA ने केलेल्या चौकशीत देसॉ एव्हिएशनने सांगितले, की त्यांनी राफेल विमानाचे 50 मॉडेल एका भारतीय कंपनीसाठी तयार केले होते. या मॉडेलसाठी 20 हजार यूरो (17 लाख रुपये) प्रत्येकी पैसे घेण्यात आले आहेत. पण, हे मॉडेल कुठे आणि कशा पद्धतीने वापरण्यात आले याचे काहीच पुरावे नाहीत. मीडिया रिपोर्टनुसार, मॉडेल बनवण्याचे काम कथितरित्या भारतीय कंपनी Defsys Solutions ला देण्यात आले होते. ही कंपनी सध्या भारतात सब-कॉन्ट्रॅक्टर कंपनी आहे. या कंपनीचे मालक असलेले सुषेण गुप्ता संरक्षण करारांमध्ये मध्यस्थ आणि देसॉ एव्हिएशन करारात एजंट आहेत. सुषेण गुप्ता यांना 2019 मध्ये ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यात ईडीने अटकही केली होती. मीडिया रिपोर्टनुसार, सुषेण गुप्तानेच मार्च 2017 मध्ये देसॉ एव्हिएशनला राफेल मॉडेल बनवण्यासाठी बिल दिले होते.

फ्रांसच्या न्यूज वेबसाइटने केलेल्या दाव्यानंतर भारतात राफेल विमानांच्या कथित घोटाळ्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राफेल घोटाळ्याचा मुद्दा लावून धरला होता. त्यात आता 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होत असताना राफेल पुन्हा चर्चेत आले. अशात काँग्रेसकडे केंद्रातील भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्यासाठी आणखी एक मुद्दा मिळाला आहे.

दरम्यान, याच मुद्याला अनुसरून शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मोदी सरकारकडे प्रश्न उपस्थित केले आहेत. यासंदर्भात ट्विट करताना प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या की, “सीबीआय सूर्याखालील प्रत्येक गोष्टीची चौकशी करू शकते… परंतु राफेल सौद्याची नाही….. सध्या चालू असलेल्या फ्रेंच रिपोर्टमध्ये आणखी काही तथ्य समोर आली असून त्यात डसॉल्टने एका दलालाला 1 मिलियन युरो देण्यास सहमती दर्शविली होती…. मध्यस्थ कोण आहेत? आणि आम्हाला सत्य का समजू नये?

 

News English Summary: The Rafael fighter jet scandal has once again come under worldwide discussion due to the French media. A French website claims that bogus deals were made by Deso Aviation. The media reported that the French anti-corruption body AFA was certified. The company’s 2017 accounts were audited. Accordingly, 5 lakh 8 thousand 925 Euros or about 4.39 crore rupees have been spent in the name of client gifts. It is unknown at this time what he will do after leaving the post. Only one March 2017 bill from the aircraft modeling company has been made available.

News English Title: Shivsena MP Priyanka Chaturvedi tweet on Rafael brokerage in India news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x