17 November 2019 9:50 PM
अँप डाउनलोड

ट्रम्प प्रशासनाने पाकची ३० कोटी डॉलर्सची मदत रोखली

वॉशिंग्टन : पाकिस्तानच्या नवनिर्वाचित सरकारला तसेच पाकचे पंतप्रधान इमरान खान यांना अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने मोठा आर्थिक दणका दिला आहे. अमेरिकेच्या लष्कराने पाकिस्तानला देऊ केलेली ३० कोटी डॉलर्सची म्हणजे तब्बल २१३० कोटीहून अधिक रकमेची मदत रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.

संबंधित रसद रोखण्यामागे दहशतवादविरोधात कारवाई करण्यात पाकिस्तान अपयश आल्याने ही मदत रोखण्यात आल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. काही दिवसांपासून ट्रम्प प्रशासनाचे पाकिस्तानशी संबंध तणावाचे होत चालले आहेत. मागील काही दिवसांपासून ट्रम्प प्रशासन ‘कोअॅलिशन सपोर्ट फंड’ या नावाने देणाऱ्या रकमेत मोठी कपात करताना दिसत आहे. त्यात पाकिस्तानवर केवळ फसवणुकीचा शेरा मारण्यात आला आहे.

पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय देण्यात येतो असं अमेरिकन प्रशासनाचं मत झालं आहे. अफगाणिस्तानाविरोधात लढ्यात सुद्धा तेथील दहशदवादी पाकिस्तानात आश्रय घेत आहेत आणि त्यामुळे अमेरिकन लष्कराच्या अडचणीत वाढत आहेत. पाकिस्तानने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. जर पाकिस्तानने योग्यती खबरदारी घेऊन दहशदवाद्यांविरुद्ध कारवाई केल्यास ३० कोटी डॉलर्सचा निधी देण्याचे आदेश दिले असं अमेरिकेचे संरक्षणमंत्री जिम मॅटिस यांनी स्पष्ट केले आहे.

हॅशटॅग्स

#Donald Trump(40)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या