15 December 2024 2:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
x

कोणाला कोणत्या महिन्यात किती वेळा ED'च्या नोटीस गेल्याची माहिती भाजप नेत्यांकडे कशी?

BJP leaders, Misuse of ED

मुंबई, २८ डिसेंबर: शिवसेनेचे दिग्गज नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली. वर्षा राऊत यांनी पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली. भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरलेले दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ वर्षा राऊत यांनाही ईडीची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान थोड्याच वेळापूर्वी संजय राऊत यांनी पत्रकारांशी थोडक्यात संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर थेट निशाणा साधला. ‘मी ईडीच्या नोटिशीबद्दल काहीच सांगत नाही.. भाजपचे नेतेच ईडीची नोटीस आल्याचं सांगत आहेत. त्यांच्याकडे जास्त माहिती आहे. त्यामुळे मी माझा माणूस भाजपच्या कार्यालयात पाठवला आहे. ईडीची नोटीस कदाचित तिथे अडकली असेल,’ असा टोला त्यांनी लगावला. हे पूर्णपणे राजकारण सुरू असल्याचंदेखील ते पुढे म्हणाले.

ईडीची नोटीस ही थेट संबंधित व्यक्तीला जाते आणि त्यात कोणीही मध्यस्त नसतो. तसेच स्वतः ईडी देखील पत्रकार परिषद घेऊन त्यासंदर्भात सार्वजनिकरित्या माहिती देत नाही किंवा ईडी संबंधित पोर्टलवर देखील ते सार्वजनिक करत नाहीत. पण राज्यात कोणालाही ईडीची नोटीस गेली तरी भाजपच्या नेत्याकडे सर्व सविस्तर माहिती असल्याचं भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांच्या ट्विट वरून सिद्ध होतं आहे. त्यामुळे खरंच भाजप ईडीचा गैरवापर करत असल्याच्या आरोपांना दुजोरा मिळत आहे.

किरीट सोमय्या यांनी एक ट्वीट करत तुम्ही लाभार्थी आहात, त्यामुळे तुम्हाला उत्तर द्यावेच लागेल, असा इशाराही संजय राऊतांना दिलाय. वयोवृद्ध गुंतवणूकदार ते पीएमसी बँक, पीएमसी बँक ते HDIL (वाधवान बंधू), वाधवान बंधू ते प्रवीण राऊत, प्रवीण राऊत ते माधूरी प्रवीण राऊत, माधूरी प्रवीण राऊत ते वर्षा / संजय राऊत, गेल्या काही महिन्यात EDकडून 3 नोटीस, पण उत्तर एकालाही नाही, का? लाभार्थी आहात तर उत्तर द्यावेच लागेल, असं ट्वीट किरीट सोमय्या यांनी केलं आहे.

 

News English Summary: The notice of the ED goes directly to the person concerned and there is no mediator. Also, the ED itself does not hold a press conference and inform the public about it, nor does it make it public on the ED related portals. But even if anyone in the state gets an ED notice, the BJP leader has all the details, as evidenced by the tweet of former BJP MP Kirit Somaiya. Therefore, the allegations that the BJP is actually abusing the ED are being confirmed.

News English Title: How BJP leaders getting every detail about ED notice sent to oppositions party leaders news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x