25 April 2024 11:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

ख्रिसमस आणि नववर्षाचं स्वागत | फटाके फोडण्यासाठी मिळणार फक्त ३५ मिनिटं

Only 35 minutes, permission, Fireworks, Christmas and new year celebration

नवी दिल्ली, २ डिसेंबर: मागील काही महिन्यांपासून कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर अनेक सण उत्सवांवर सरकारने नियमावली लावली होती. त्यामुळे देशातील जवळपास सर्वच धर्मियांच्या सर्वच सणांचा आनंद मावळल्याचं पाहायला मिळालं. अगदी दिवाळीत देखील लक्ष्मी पूजनाचा दिवस वगळता फटाके वाजवण्यावर सरकारने बंदी घातली होती.

आता संपूर्ण वर्ष कोरोना आपत्तीमुळे वाया गेल्यानंतर जग नववर्षाच्या पदार्पणाजवळ येऊन थांबलं आहे. मात्र आता त्याच पार्श्वभूमीवर आणि कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या सावटाखाली याच वर्षा अखेरच्या सणांवर नियमावली लागणार आहे. त्यामुळे अनेकांचा हिरमोड होणार असला तरी काहीसा दिलासा देखील मिळणार आहे.

कारण नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलने (एनजीटी) संपूर्ण देशभरात हवेच्या खराब गुणवत्तेमुळे आणि कोरोनाच्या धोक्यामुळे फटाक्यांच्या खरेदी आणि विक्रीवर बंदी घातली (National Green Tribunal (NGT) has banned crackers across the country) आहे. मात्र ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी (Christmas and New Year’s Eve) हवेची गुणवत्ता चांगली असणाऱ्या शहरांमध्येच फटाके फोडण्याची परवानगी देखील दिली आहे. यात महत्वाची बाब म्हणजे वर्षअखेर ३१ डिसेंबरच्या रात्री ११.५५ ते १२.३० वाजेपर्यंत म्हणजे फक्त ३५ मिनिटं पर्यावरणाला कमी हानी पोहोचवणारेच फटाके फोडता येणार आहेत.

दिल्ली, एनसीआर यासारख्या देशातील हवेची गुणवत्ता खराब असलेल्या शहरांमध्ये फटाक्यांच्या विक्री आणि खरेदीवर पूर्णपणे बंदी असल्याचं एनजीटीचे अध्यक्ष आणि न्यायाधीश आदर्शकुमार गोयल यांनी सांगितलं. हवेची गुणवत्ता चांगली असणाऱ्या शहरांमध्ये ख्रिसमस आणि नववर्षच्या स्वागतावेळी रात्री ११.५५ ते मध्यरात्री १२.३० पर्यंतच्या कालावधीत पर्यावरणपुरक फटाके फोडण्यास मूभा देण्यात आल्याचंही ते पुढे म्हणाले.

 

News English Summary: The National Green Tribunal (NGT) has banned the purchase and sale of crackers across the country due to poor air quality and the threat of corona. But fireworks are also allowed in cities where the air quality is good for Christmas and New Year’s Eve. The important thing is that at the end of the year, on the night of 31st December from 11.55 pm to 12.30 pm, only 35 minutes of firecrackers that can cause less damage to the environment can be fired.

News English Title: Only 35 minutes permission for fireworks during Christmas and new year celebration News updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x