14 December 2024 11:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

यांना काहीच जमत नाही | फक्त हात धुवा, अंतर ठेवा, घरात बसा एवढंच - नारायण राणे

BJP MP Narayan Rane, MahaVikas Aghadi government

मुंबई, १२ नोव्हेंबर: महाराष्ट्रात दिवाळीनंतर ठाकरे सरकारचे फटाके वाजतील असं सूचक विधान भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी केलं आहे. “लवकरच महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारचे फटाके वाजतील. यांना काहीच जमत नाही त्यामुळे ती वेळ लवकरच येईल. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात सुरु आहे. भ्रष्टाचार थांबत नाही तोपर्यंत फटाके वाजणार. तो काढायला गेलं तर फार वेळ लागेल, त्यामुळे वेळ आल्यावर तोदेखील समोर आणू,” असं नारायण राणे यांनी एबीपी माझा वृत्त वाहिनीशी बोलताना म्हटलं आहे.

खासदार नारायण राणे यांनी यावेळी फटाके फोडण्यावर महाविकास आघाडी सरकारने लावलेल्या निर्बंधावरुनही टीका केली. “दिवाळीला फटाकेबंदी करण्याच्या मताचा मी नाही. सण साजरे करण्यात तुम्ही व्यत्यय आणता. सगळीच लहान मुलं, मोठे लोक फटाके वाजवून आनंद लुटतात. तोदेखील तुम्ही घेऊ देत नाही. फक्त हात धुवा, अंतर ठेवा, घरात बसा एवढंच सांगतात. सर्वांनी दिवाळी साजरी केली पाहिजे,” असं भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

“मुख्यमंत्रीदाला शोभणारं एकही काम केलेलं नाही. पिंजऱ्यातून हात धुवा आणि अंतर ठेवा याच्यापलीकडे मुख्यमंत्र्यांना काही सांगता येत नाही. राज्याचा त्यांना अभ्यास नाही. ठाकरे कुटुंबीयांचे बरेच जमीन व्यवहार आहेत. बाळासाहेब असेपर्यंत ठाकरे कुटुंबाची शिवसैनिकांसोबत पार्टनरशिप नव्हती. मातोश्रीवर देवाण घेवाण करुन व्यवहार होतात. आमदार, खासदारांना काही स्थान नाही,” असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला आहे.

 

News English Summary: Bharatiya Janata Party (BJP) MP Narayan Rane has said that the Thackeray government will firecrackers in Maharashtra after Diwali. Soon the Mahavikas Aghadi government will start firing in Maharashtra. They don’t know anything, so that time will come soon. Corruption is rampant. Firecrackers will explode until corruption stops. It will take a long time to remove it, so when the time comes, we will bring it forward, said Narayan Rane while talking to ABP My News Channel.

News English Title: BJP MP Narayan Rane criticized MahaVikas Aghadi government news updates.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x