VIDEO - मुंबई ते मांडवा प्रवास...रो-रो सेवेमुळे आता पाऊण तासात
मुंबई : भाऊचा धक्का ते मांडवा या मार्गावरील बहुप्रतीक्षित रो रो सेवेचा शुभारंभ झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी सकाळी रो रो सेवेचे लोकार्पण करण्यात आले. मुंबई-अलिबाग अंतर आता अवघ्या पाऊण तासात गाठता येईल. भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी सेवेसारखीच जलवाहतूक किनारपट्टीवरील अन्य ठिकाणी सुरु करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकार्पण सोहळ्यानंतर दिली.
अशी असेल भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी रो-रो सेवा…@CMOMaharashtra @OfficeofUT @AjitPawarSpeaks @AUThackeray pic.twitter.com/j9OR3NSwEA
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 15, 2020
भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी रो-रो सेवा सुरु करण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत केली अशा सर्वांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धन्यवाद दिले. या सेवेमुळे प्रवाशांना चांगली सुविधा मिळणार आहे. शासनाने मांडावा जेट्टी येथे यासाठी सर्व सोयी उपलब्ध करून देण्यासाठी महत्वाचे योगदान दिले असून किनारपट्टीच्या भागात सर्वत्र अशी जलवाहतूक सुरू करता येईल का ते आम्ही पाहत आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या सेवेनिमित्त रायगड व कोकणवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. रायगडसह कोकणात चिपळूणपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही फेरीसेवा उपयुक्त ठरेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे.
या संदर्भातला एक व्हिडीओही पोस्ट करण्यात आला आहे. ही सेवा नेमकी कशी असेल हे सांगणारा हा व्हिडीओ आहे. रो-रो सेवेसाठी ग्रीस येथून आणलेल्या जहाजाची चाचणी यशस्वी ठरली आहे. एकाचवेळी एक हजार प्रवासी आणि २०० कार वाहून नेण्याची क्षमता जहाजाची आहे. साधारण तिकिट २२० रुपये, एसीचे तिकीट ३३० रुपये तर लक्झरी क्लासचे तिकीट ५५० रुपये आहे. कारच्या आकारानुसार ११०० ते १९०० रुपये तिकीट आकारण्यात येईल.
News English Summery: Brother’s push to ro-ro service has been launched. Due to this, the distance from Mumbai to Alibaug can be cut in just a few hours. Can the ferry be launched elsewhere on the coast, just like Brother’s push to Mandawa Jetty service? Chief Minister Uddhav Thackeray has said that the state government is trying for this. Chief Minister Uddhav Thackeray has thanked all those who directly and indirectly assisted him in launching the Bhava shock to Mandawa Jetty Ro-Ro service. Chief Minister Uddhav Thackeray also said that this service will promote environmentally friendly water transport. A video has been posted in this regard. This is a video explaining exactly what this service will be like. Testing of ships brought from Greece for the Ro-Ro service has been successful. The ship has the capacity to carry 1,000 passengers and 200 cars at a time. Normal tickets are Rs 220, AC tickets Rs 330 and luxury class tickets Rs 550. Tickets will be charged from 1100 to 1900 depending on the size of the car.
Web News Title: Story Mumbai Mandwa ro ro service launched by Chief Minister Uddhav Thackeray News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News