13 December 2024 8:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH
x

मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची बदली

Mumbai BMC Commissioner, Praveen Pardeshi, transferred

मुंबई, ८ मे:  राज्यातील ‘आयएएस’ अधिकाऱ्यांच्या राज्य सरकारने शुक्रवारी बदल्या केल्या आहेत. यात मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची बदली केली आहे. प्रवीण परदेशी यांची नगरविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली केली आहे. आता प्रवीण परदेशी यांच्या जागी इक्बाल चहल हे मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त असणार आहेत.

मुंबईत करोनाचा कहर वाढत असताना धडाडीचे निर्णय घेणारे आयुक्त म्हणून प्रवीण परदेशी यांचं नाव घेतलं जात होतं. अशात त्यांची आता बदली करण्यात आली आहे. तर ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त संजीव जैस्वाल हे पद मिळण्याची वाटच बघत होते. त्यांना आता मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पद देण्यात आले आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जरड यांनाही हटवण्यात आलं आहे. त्यांच्याजागी संजीव जैस्वाल यांची अतिरिक्त आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

प्रविण परदेशी यांनी मे २०१९ मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता. याआधी त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिलं आहे. परदेशी यांनी आपल्या २९ वर्षांच्या कार्यकाळात लातूर आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिलं आहे.

 

News English Summary: The state government on Friday transferred IAS officers in the state. Mumbai Municipal Commissioner Praveen Pardeshi has been transferred. Praveen Pardeshi has been transferred as Additional Chief Secretary, Urban Development Department. Now, Praveen Pardeshi will be replaced by Iqbal Chahal as the new Commissioner of Mumbai Municipal Corporation.

News English Title: Story Mumbai BMC Commissioner Praveen Pardeshi shunted transferred to urban development News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x