ग्रेट रतन टाटा! पालिकेच्या आरोग्य सेवकांना ताज हॉटेलमध्ये खोल्या उपलब्ध
मुंबई, ४ एप्रिल: देशात ओढावलेल्या परिस्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांनी पुढाकार घेऊन तब्बल १५०० कोटींची घोषणा केली होती. आता त्यांनी आणखी एक समाजहित केलं आहे. मुंबई पालिकेच्या रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी टाटा समूहाच्या मालकीची मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्सची दारं खुली करून दिली आहे. या निर्णयानंतर समाज माध्यमांमध्ये रतन टाटा यांच्यावर स्तुतीसुमने उधळली जात आहेत.
कोरोनाविरुद्धच्या लढाईत तब्बल दीड हजार कोटी रुपयांची भरघोस आर्थिक मदत देणाऱ्या रतन टाटा यांच्या उद्योग समुहानं आपल्या सामाजिक दायित्वाचा अनोखा आदर्श घालून दिला आहे. कोरोनाच्या संकटात अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या महापालिकेचे डॉक्टर, नर्स आदी आरोग्य सेवकांना ताज हॉटेलमधून जेवण पुरवण्याचा उपक्रमही त्यांनी सुरु केला. पण आता तर डॉक्टर आणि नर्स यांना कुलाब्यातील हॉटेल ताज, बांद्र्यातील हॉटेल ताज लँण्ड्स एन्डसह मुंबईतील पाच पंचतारांकित हॉटेल्समध्ये राहण्याची व्यवस्थाही केली आहे.
आर्थिक मदत आणि जेवण अशी व्यवस्था केल्यानंतर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्स यांची टाटा समुहाच्या मुंबईतील ५ पंचतारांकीत हॉटेलमध्ये राहण्याची सोय देखिल करण्यात आली आहे. कुलाबा येथील हॉटेल ताज महल पॅलेस, सांताक्रुजमधील ताज, द प्रेसिडेंट, अंधेरी एमआयडीसीतील जिंजर आणि बांद्र्यातील हॉटेल ताज लँण्ड्स एन्ड या हॉटेलमध्ये अशी व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती इंडियन हॉटेल कंपनी लिमिटेडच्या प्रवक्त्यानं दिली आहे.
News English Summary: Senior entrepreneur Ratan Tata had announced an additional Rs.1500 crore to take the country out of the situation in the country. Now they have socialized another. The five-star hotel in Mumbai, which is owned by the Tata group, has been opened to accommodate doctors and medical staff working in the Mumbai Municipal Hospital. After this decision, Ratan Tata is being eulogized in the social media. In the fight against Corona, Ratan Tata’s business community, which provides a huge financial assistance of Rs 1.5 billion, has set a unique example of its social responsibility. He also started an initiative to provide food from the Taj Hotel to the municipal doctors, nurses and health workers who played essential services in the crisis of Corona. But now doctors and nurses have been arranged to stay at Hotel Taj in Colaba, Hotel Taj Lands End in Bandra and stay at five star hotels in Mumbai.
News English Title: Story TATA Group providing accommodation for BMC doctors and Nurses in Taj Hotel Corona Crisis News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News