26 April 2024 7:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

लाखो कोटीचे प्रकल्प गुजरातला हलवून महाराष्ट्राला अति सूक्ष्म प्रकल्प दिले, पण मार्केटिंग जोरात असंच चित्र

DCM Devendra Fadnavis

DCM Devendra Fadnavis | पुण्याजवळच्या रांजणगाव या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरची घो,णा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे आणि याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभारही मानले आहेत. या अंतरग्त दोन हजार कोटींची गुंतवणूक आणि पाच हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे लाखो कोटीचे प्रकल्प गुजरातला हलवून महाराष्ट्राला अति सूक्ष्म प्रकल्प दिल्याची चर्चा सुरु झाली आहे.

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणाच्या अंतर्गत महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गिफ्ट मिळालं असल्याचा प्रचार भाजपने सुरु केला आहे. पुण्यातल्या रांजणगाव या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर करण्यात आलं आहे. २००० कोटींची गुंतवणूक यासाठी करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे ५ हजार रोजगारांची निर्मिती होणार आहे. २९७ एकर जागेवर हे क्लस्टर उभारलं जाणार आहे. त्यासाठी ४९२ कोटींचा खर्च होणार आहे. २०७.९८ कोटी हे केंद्र सरकारतर्फे दिले जाणार आहेत अशीही माहिती देण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात केंद्राकडे पाठपुरावा केला होता, त्याला यश मिळाले असून या संदर्भात दिल्लीत आज घोषणा करण्यात आली आहे, गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे समजते. दरम्यान, दिल्लीतील अधिकारी पुण्यात येऊन गेले आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा सुद्धा केली होती. त्यानंतर आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी नुकतीच दिल्लीत ही घोषणा केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: DCM Devendra Fadnavis PC check details 31 October 2022.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x