22 April 2025 9:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | शेअर असावा तर असा, तब्बल 1,33,786 टक्के परतावा, संयम पळणारे श्रीमंत झाले - NSE: BEL Bonus Share News | अशी संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: UEL Horoscope Today | 23 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | आयआरबी शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: IRB Reliance Power Share Price | शेअर प्राईस 43 रुपये; रिलायन्स पॉवर शेअर्सबाबत फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Apollo Micro Systems Share Price | तगडा परतावा मिळेल, हा डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार - NSE: APOLLO Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 23 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

पुणे | स्टार्टअपने बनवला अनोखा मास्क | संपर्कात येताच कोरोना नष्ट होईल - कंपनीचा दावा

पुणे, १८ जून | पुण्यातील एका स्टार्टअप कंपनीने थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खास प्रकारचा मास्क तयार केला आहे. फार्मास्युटिकल कंपनीच्या सहकार्याने तयार केलेल्या या मास्कविषयी असा दावा केला जात आहे की बाहेरून कोणताही विषाणू त्याच्या संपर्कात येताच तो मरुन जाईल. मास्क निर्माता कंपनी ‘थिंकर टेक्नॉलॉजी’ नुसार यामध्ये व्हायरस नष्ट करण्यासाठी एक विशेष लेपची कोटिंग करण्यात आली आहे. यामुळे, सार्क-कोवि -2 म्हणजेच कोरोना विषाणूचा त्वरित नष्ट होतो.

विज्ञान आणि प्रोद्योगिकी विभाग (डीएसटी) द्वारे सोमवारी मास्क जारी करण्यात आले. थिंकर टेक्नॉलॉजीच्या डायरेक्टर शीतल झुंबड म्हणाल्या की, हे लेप मानवी वापरासाठी सुरक्षित आहे कारण त्यात वापरण्यात येणाऱ्या साहित्याचा वापर साबण आणि साध्या सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरले जातात. या लेपमध्ये सोडियम ऑलेफिन सल्फोनेट सारख्या रसायनांचा वापर केला गेला आहे. या कोटिंगच्या संपर्कात आल्यावर कोरोना विषाणूचे बाहेरील आवरण नष्ट होते. सामान्य तापमानात त्याचा सहज वापर करता येतो.

शीतल पुढे म्हणाल्या की कोरोना कालावधीत मास्क वापरणे फार महत्वाचे होते, परंतु सामान्य जनता घरगुती मास्कचा जास्तीत जास्त वापर करत होती. या मास्कची गुणवत्ता खालावत चालली होती. म्हणूनच चांगल्या प्रतीचा मास्क आवश्यक होता. येथूनच या मास्कची कल्पना आली. शीतल यांच्या म्हणण्यानुसार, सध्या एका स्वयंसेवी संस्थेमार्फत नंदुरबार, नाशिक आणि बंगळुरुमधील 4 सरकारी रुग्णालयांमधील आरोग्य कर्मचार्‍यांना सुमारे 6000 मास्क वितरित करण्यात आले आहेत. बंगळुरूमधील मुलींच्या शाळा आणि महाविद्यालयांनाही मास्क वितरित करण्यात आले आहेत.

95% इफेक्टिव्ह आहे हा मास्क:
3 डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून N 95 मास्क, थ्री प्ले मास्क, तसेच एका साधारण कपड्याच्या मास्कवर या लेपचा वापर करुन त्याला 95% पेक्षा जास्त प्रभावी बनवले जाते. शीतल यांनी सांगितले की, पुढच्या आठवड्यापासून हे मास्क 80 रुपयांमध्ये सामान्य लोकांना उपलब्ध होईल. शीतल यांच्यानुसार, याच्या निर्मितीमध्ये ते कंपनीच्या सर्व गाइडलाइन्स फॉलो करत आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Pune based startup made a unique mask against coronavirus which will die as soon as it comes in contact news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या