25 March 2023 10:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Scheme Balance | खुशखबर! PPF मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांच्या खात्यात 31 मार्चला पैसे ट्रान्सफर होणार, अधिक जाणून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरची 2023, 2024, 2025, 2030 मध्ये टार्गेट प्राईस किती असेल? तज्ज्ञांचं मत पहा आता निरव मोदी, ललित मोदी आणि मेहुल चोक्सी भारतात परतून स्वतःला OBC नेते घोषित करतील, भाजप त्यांचं स्वागत करेल - रवीश कुमार Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या SBI Bank mPassbook | पासबुक अपडेटसाठी आता SBI बँकेत जाण्याची गरज नाही, असं करा सहज ऑनलाईन अपडेट CIBIL Score | कर्जाचा EMI थकवल्याने डिफॉल्ट झाल्यावरही सिबिल स्कोर कसा सुधारू शकता पहा SIP Calculator | अशी SIP करा म्हणजे 4 वर्षांनंतर 15 लाख रुपयांची कार खरेदी करू शकाल, संपूर्ण गणित पहा
x

सुप्रीम कोर्टातील खटल्यांची सुनावणी आणि अचानक सुनावणी रजिस्ट्रीच्या लिस्टिंगमधून डिलीट होणं | चीफ जस्टीस मोठं वक्तव्य करणार

CJI takes note of plea of senior lawyer on deletion of cases by SC registry check details 22 August 2022

CJI N V Ramana | भारताचे सरन्यायाधीश (सीजेआय) एन. व्ही. रमणा यांनी गेल्या आठवड्यात (बुधवारी) वरिष्ठ वकील आणि एससीबीएचे माजी अध्यक्ष दुष्यंत दवे यांच्या खटल्यांची लिस्टिंग आणि हिअरिंग हटविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीच्या कामकाजाबाबत केलेल्या निवेदनाची दखल घेतली आणि ते म्हणाले की, ते आपल्या निरोपाच्या भाषणात या गंभीर विषयाबद्दल भाष्य करतील. पीटीआयने याबाबत माहिती दिली आहे.

24 एप्रिल 2021 रोजी 48 वे सीजेआय म्हणून पदभार स्वीकारणारे न्यायमूर्ती रमणा यावर्षी 26 ऑगस्ट रोजी पदभार सोडतील. यावर पुढे मुख्य न्यायाधीश म्हणाले की, “आम्ही काल रात्री ८ वाजेपर्यंतचे या खटल्यांचे संक्षिप्त वाचन केले. आमच्या अनेक परिषदा देखील झाल्या आणि त्यानंतर कळत की ती हिअरिंग लिस्टिंगमधून काढून टाकण्यात आली आहे, हे अत्यंत चुकीचे आहे आणि रजिस्ट्रीच्या या चुकीच्या पद्धती अवमानित करण्यासारख्या आहेत असे ते पुढे म्हणाले.

मुख्य न्यायाधीश पुढे म्हणाले की, “अशा बऱ्याच समस्या आहेत ज्या मला अधोरेखित करायच्या आहेत, परंतु कार्यालय सोडण्यापूर्वी मला काहीही करता येणार नाही. पण या सगळ्याबद्दल मी माझ्या निरोपाच्या भाषणात नक्की बोलेन. त्यामुळे कृपया थांबा, असे सीजेआय म्हणाले. दवे यांनी काही घटनांचा संदर्भ देऊन शेवटच्या क्षणी लिस्टेड मॅटर्स हिअरिंगच्या लिस्टिंगमधून कशा प्रकारे हटवल्या जातात हे अधोरेखित केले, ज्यामुळे वकिलांना त्रास होतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: CJI takes note of plea of senior lawyer on deletion of cases by SC registry check details 22 August 2022.

हॅशटॅग्स

#Supreme Court(136)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x