13 May 2021 2:21 AM
अँप डाउनलोड

न्या. रंजन गोगोई यांची सर्वोच्च न्यायालयाचे ४६ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज न्या. रंजन गोगोई यांची सर्वोच्च न्यायालयाचे ४६ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. आज सकाळी १०.४५ वाजता राष्ट्रपती भवनामध्ये शपथ विधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

त्याआधी सर्वोच्च न्यायालयाचे ४५ वे सरन्यायाधीश दीपक मिश्रा २ ऑक्टोबर रोजी निवृत्त झाले आहेत. त्यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून गोगोईंचं नाव केंद्र सरकारला पाठवलं होतं. त्यावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केलं होतं. गोगोई यांनी आजपासून सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदाचा पदभार स्विकारला आहे.

सर्वात चर्चेतील आणि धार्मिक विवादाच्या कचाट्यात अडकलेल्या अयोध्या प्रकरणावर सुनावणी हे गोगोई यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. तसेच प्रलंबित खटले निकाली काढण्याची महत्वाची कामं आहेत.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x