28 January 2023 7:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Hindenburg Report Vs Adani Group | देशाची अर्थव्यवस्था हादरनार? अदानी ग्रुप अडचणीत सापडणार? MSCI इन ऍक्शन ICICI Mutual Fund | मल्टिबॅगर स्टॉक नव्हे तर मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, सर्वाधिक परतावा देणाऱ्या योजनेची डिटेल्स पहा Horoscope Today | 29 जानेवारी 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Hindenburg Report Adani Group | अदानी ग्रुपबाबत हिंडेनबर्गचा अहवाल 'अत्यंत विश्वासार्ह'!, दिग्गज अब्जाधीश विल्यम एकमन Numerology Horoscope | 29 जानेवारी, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल? तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Bank Balance on WhatsApp | तुमच्या व्हॉट्सॲपवर समजेल तुमचा बँक बॅलन्स, जाणून घ्या प्रक्रिया Speciality Restaurants Share Price | रेस्टॉरंट चेन चालवणाऱ्या कंपनीच्या शेअरने 170% परतावा दिला, आता स्टॉक नवीन टार्गेटच्या दिशेने
x

Cerebral Palsy Causes | 'सेरेब्रल पाल्सी' | मुलांच्या विकसनशील मेंदूशी संबंधित गंभीर आजार - नक्की वाचा

Cerebral palsy causes and symptoms

मुंबई, १९ ऑगस्ट | दरवर्षी ३००० बालकांमागे ३ मुलं सेरेब्रल पाल्सी आजाराने त्रस्त आहेत. सेरेब्रल पाल्सी हे भारतातल्या लहान मुलांमध्ये अपंगत्व येण्याचे मुख्य कारण आहे. सेरेब्रल पाल्सी होण्याच्या मागे अनेक बाबी कारणीभूत आहेत. सेरेब्रल पाल्सी हा विकार हालचालींशी संबंधित असून यात स्नायूंची शक्ती, त्याचे नियमन आणि अतिरिक्त ताठरतेमुळे हालचालींवर मर्यादा येतात. ही लक्षणे स्नायूंच्या झिजेमुळे नाही तर मेंदूला होणाऱ्या हानीमुळे होतात.

सेरेब्रल पाल्सी ही एक अशी समस्या आहे की मुलांच्या विकसनशील मेंदूला (Cerebral palsy causes) दुखापत करू शकते. ही एक न्यूरॉलॉजिकल समस्या आहे. बालपणातील गंभीर अपंगत्वाचे कारण बनू शकतं. भारतामध्ये दर १००० लोकांमागे ३ जणांना याची लागण होते. याची काही मुख्य लक्षणे आहेत जसे की जन्मापासून ते ५ वर्षापर्यंत ज्या प्रक्रिया शारीरिक हालचालींमध्ये व्हायला हव्यात त्यांना विलंब लागू शकतो. वयानुसार याची लक्षणे बदलू शकतात . ३ ते ६ महिन्याच्या बाळाला पुढील लक्षणे दिसतात जसे की स्नायूंमध्ये कमी शक्ती,अधिक वाढलेली पाठ व मान ,शरीरात ताठरता इत्यादी.

मूल स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण ठेवू शकत नाही (Cerebral palsy causes and symptoms in Marathi) :

सेरेब्रल पाल्सी असणारे मूल स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण ठेवू शकत नाही. तसेच त्यांच्या हाताच्या तसेच पायांच्या स्नायूंमध्ये ताठरता वाढते. जरी हा प्राथमिकदृष्ट्या हालचालींवर मर्यादा आणणारा विकार असला तरी मेंदूतील ज्या भागावर हा परिणाम घडवतो, त्यानुसार रुग्णाच्या आकलनक्षमता, शिकणे, बुद्धी, स्वभाव, संवाद, वाचा, संवेदना, श्रवण तसेच दृष्टीवर परिणाम घडवतो.

सेरेब्रल पाल्सी हा आयुष्यावर कायमस्वरुपी परिणाम घडवतो. विकारात मेंदूला होणारी इजा ही कायमची असते. मेंदूला एकदा हानी झाली की ती अधिक वाढत नाही पण बरीही करता येत नाही परंतु या लक्षणांमध्ये सुधार किंवा बिघाड ही रुग्णाच्या घेतल्या जाणाऱ्या काळजीवर अवलंबून असते. त्यामुळे सेरेब्रल पाल्सी म्हणजे काय हे समजून घेताना त्याची लक्षणे, त्याचे परिणाम याविषयी माहिती करून घेणे मोलाचे ठरते. जेणेकरून त्या रुग्णाचे योग्य व्यवस्थापन करून रुग्णाच्या त्रासात भर पडणार नाही.

१० महिन्यांपेक्षा मोठ्या बाळाला आधाराशिवाय उभे न राहता येणे, दुसऱ्या बाजूकडे रांगण्यासाठी प्राधान्य. याची काही मुख्य कारणे आहे जसे की मेंदू निर्माण होण्याच्या टप्प्यात त्याला झालेल्या कोणत्याही दुखापतीमुळे होते. हे स्नायूंची शक्ती,शरीराची मुद्रा, हालचाल,स्नायू नियंत्रण यांना प्रभावित करते. याचे निदान काही शारीरिक तपासणी आणि लक्षणांचे मुल्याकंन करून करतात. तसेच उपचार चालू झाल्यास दैनंदिन परीक्षण करणे गरजेचे असते.

योग्य वेळी उपचार केल्यास…
हा आजार गंभीर स्वरूपाचा असला तरी योग्य वेळी उपचार केल्यास निश्चितच चांगले बदल दिसून येतात. त्यामुळे निराश न होता औषधोपचार, आहार व व्यायाम या गोष्टींमध्ये सातत्य ठेवल्यास आपण सेरेब्रल पाल्सिग्रस्त बाळाला चांगले आयुष्य नक्कीच देवू शकतो. स्टेमसेल्स थेरपी सारख्या उपचार पध्दतीमुळे अशा गंभीर आजाराशी लढण्यास फायदेशीर ठरते. या मुलांमध्ये आनंद, उत्साह, आत्मविश्वास भरण्याची गरज आहे. दैनंदिन जीवनात व्यायाम, पोषक आहाराचा समावेश करणेही तितकेच गरजेचे आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Cerebral palsy causes and symptoms in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x