27 July 2024 6:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

SBI Mutual Fund | हे एसबीआय म्युच्युअल फंड देतील मजबूत परतावा, गुंतवणूक करून सय्यम ठेवा, आयुष्य बदलेल हे नक्की

SBI mutual fund

SBI Mutual Fund | आजकाल महागाई अतिशय वेगाने वाढत आहे.अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे बचतीचे आणि गुंतवणुकीचे योग्य नियोजन केले पाहिजे. भारतातील खूप मोठी लोकसंख्या अजूनही बँक एफडी अंक कोणत्यातरी छोट्या मोठ्या सरकारी योजनेला गुंतवणुकीसाठी प्राथमिक पर्याय म्हणून निवडते. दुसरीकडे तुम्हाला बँक एफडी किंवा कोणत्याही सरकारी योजनेत गुंतवलेल्या पैशावर गाव तसा जास्त परतावा कधीच मिळत नाही. अशा परिस्थितीत, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि सुरक्षित जीवन जगण्यासाठी आणि तुमचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी तुम्हाला हुशारीने आणि संयमाने गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे.

जर तुम्ही नियोजनबद्ध आणि स्मार्ट पद्धतीने योग्य गुंतवणूक केली तर या स्थितीत तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर जबरदस्त परतावा मिळू शकतो. या लेखात, आज आम्ही तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्वोत्तम म्युच्युअल फंड योजनांबद्दल माहिती देणार आहोत, जिथे गुंतवणूक करून तुम्ही मुदतपूर्ती वेळी जबरदस्त परतावा मिळवू शकता.

SBI च्या या म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला मुदत ठेव किंवा आवर्ती ठेव योजनेपेक्षा तीन ते चार पट अधिक जास्त परतावा मिळू शकतो. अशा परिस्थितीत या योजना गुंतवणुकीसाठी बेस्ट पर्याय आहेत.

एसबीआय स्मॉल कॅप म्युचुअल फंड :
जर तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी एक चांगली म्युच्युअल फंड योजना शोधत असाल तर ही योजना तुम्ही जाणून घेतली पाहिजे. मागील तीन वर्षांत या योजनेंतर्गत गुंतवणूकदारांना 26.40 टक्के वार्षिक परतावा मिळाला आहे. तर दुसरीकडे, जर तुम्ही पुढील पाच वर्षांचा विचार केला तर यामध्ये गुंतवणूकदारांना वार्षिक 19.27 टक्के इतका सरासरी दर वार्षिक परतावा मिळाला आहे.

एसबीआय टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंड :
जर तुम्ही जबरदस्त बंपर परतावासह एसबीआयचा म्युच्युअल फंड शोधत असाल, तर तुम्ही एसबीआयच्या टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंडमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. या म्युच्युअल फंडाने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 27.84 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर दुसरीकडे, मागील पाच वर्षांत वार्षिक परतावा दर 26.23 टक्के राहिला आहे.

एसबीआय मॅग्नम मिडकॅप फंड :
SBI ची ही म्युचुअल फंड योजना गुंतवणुकीसाठी जबरदस्त परतावा देणारी योजना मानली जाते. मागील तीन वर्षांत या योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 23.38 टक्के वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. तर दुसरीकडे, मागील पाच वर्षांत या योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक 12.57 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

नेहमी लक्षात ठेवा की म्युचुअल फंड मध्ये मिळणारे हे परतावे बाजाराच्या वर्तनावर आधारित असतात. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर जो तुम्हाला मिळणारा परतावा असतो, तो पूर्णपणे बाजाराच्या वर्तनाशी सुसंगत असतो. नेहमी लक्षात ठेवा की म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते, त्यामुळे कधी ही म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| SBI mutual fund investments opportunity for huge returns on 22 August 2022.

हॅशटॅग्स

SBI mutual fund(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x