6 May 2024 4:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

महागाई, पेट्रोल-डिझेल, गॅस दरांमुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी | मोदी लाटेवर अवलंबून राहू नका - अहवाल दिल्लीला

Jammu Kashmir Assembly Election

नवी दिल्ली, ०६ सप्टेंबर | जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. परंतु, केंद्र सरकार मतदारसंघांची पुनर्रचना केल्यानंतरच निवडणूक घेईल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्याची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षानंदेखील निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मात्र बुद्धिजीवी वर्गानं दिलेल्या इशाऱ्यानं भाजपची चिंता वाढली आहे.

महागाई, पेट्रोल-डिझेल, गॅस दरांमुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी, मोदी लाटेवर अवलंबून राहू नका – Jammu Kashmir Assembly Election alert to BJP in report :

भारतीय जनता पक्षानं जम्मूच्या आर एस पुरामध्ये बुद्धिजिवींची बैठक बोलावली होती. त्यात झालेल्या मंथनानं भारतीय जनता पक्षाची चिंता वाढली आहे. महागाई, बेरोजगारीमुळे पक्षाविरोधात सर्वसामान्यांमध्ये नाराजी आहे, असं बुद्धिजिवींनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं. काश्मीर खोऱ्यात मोदी लाटेच्या जीवावर पुढे जाऊ नका, असंदेखील बुद्धिजिवींनी सांगितलं. या निवडणुकीत मोदींचा करिश्मा चालणार नाही असा बुद्धिजिवींचा अंदाज आहे. त्यांनी दिलेला अहवाल नुकताच दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात पोहोचला. त्यामुळे भारतीय जनता पक्षासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चिंतादेखील वाढली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये तगडा चेहरा शोधण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाकडून सुरू आहे. त्यासाठी भाजप इतर पक्षातील नाराजांवर नजर ठेवून आहे. ‘जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीत भाजपनं मोदी लाटेच्या भरवशावर राहू नये. कारण लोकांच्या मनात सरकारच्या धोरणांबद्दल नाराजी आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये वाढ झाल्याची झळ सर्वसामान्यांना बसत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात नाराजी आहे,’ असं बुद्धिजिवींना त्यांच्या अहवालात नमूद केलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Jammu Kashmir Assembly Election alert to BJP in report.

हॅशटॅग्स

#JammuKashmir(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x