24 March 2023 5:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ChatGPT Job Effect | चॅट जीपीटी'मुळे या क्षेत्रातील नोकऱ्यांना प्रचंड धोका, कोणत्या नोकऱ्या सुरक्षित? लिस्ट मध्ये तुमची नोकरी कोणती? Accenture Job Loss | आयटी क्षेत्रात भूकंप, दिग्गज कंपनी अ‍ॅक्सेन्चर 19,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार OnePlus Nord CE 3 Lite 5G | वनप्लसचा 108 MP कॅमेरा असलेला स्वस्त Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन लाँच होणार, किंमत-फीचर्स? Hindenburg Report on Block Inc | अदानींनंतर हिंडनबर्गचा बॉम्ब या उद्योगपती फुटला, शेअर्स 20 टक्क्यांनी कोसळले Numerology Horoscope | 24 मार्च, तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Deep Industries Share Price | या शेअरने 552 टक्के परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिटची घोषणा, स्टॉक स्प्लिटचा फायदा घ्या Sera Investment Share Price | लॉटरीच लागली! गुंतवणुकदारांना 454 टक्के परतावा दिल्यानंतर आता हा शेअर स्प्लिट होतोय
x

दिल्लीत नितीश कुमार आणि शरद पवार कार्यरत होताच, राज्य भाजप नेत्यांची बारामतीत हेडलाईन मॅनेजमेंटसाठी केविलवाणी राजकीय धडपड

Loksabha Election 2022

Loksabha Election 2022 | जनता दल युनायटेडच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीनंतर दुसऱ्याच दिवशी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी देशातील मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांना एकत्र आणण्याच्या मोहिमेवर सोमवारी पाटणाहून दिल्लीला रवाना झाले. जदयूने त्यांना देशभरातील विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे अधिकार दिले आहेत. दिल्ली विमानतळावर त्यांनी माध्यमांना सांगितले की, मला पंतप्रधान होण्याची कोणतीही आकांक्षा नाही. विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा माझा प्रयत्न आहे. ‘आज देशात प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा कट सुरू आहे.

आपल्या प्रचारात नितीश कुमार सोमवारी संध्याकाळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांना त्यांच्या दिल्लीतील 12 तुघलक लेन या निवासस्थानी पहिल्यांदा भेटायला गेले होते. या दोघांमधील बैठक सुमारे ५० मिनिटे चालली. राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांना एकत्र आणण्याच्या रणनीतीवर चर्चा केली. यानंतर नितीश कुमार माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या निवासस्थानी पोहोचले. तेथे त्यांनी कुमार एच.डी.कुमारस्वामी यांच्याशी बातचीत केली. नितीशकुमार यांनी विरोधी पक्षांना एकत्र आणण्याच्या मोहिमेचे कुमारस्वामी यांनी कौतुक केले. तुमच्या येण्याने वातावरण तयार झाले आहे, असे सांगितले. तुम्ही पुढे चला, आम्ही तुझ्याबरोबर आहोत असं संदेश त्यांना कुमारस्वामी यांनी दिला.

आज मंगळवारी ते विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री नितीश दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन डावे नेते सीताराम येचुरी, डी. राजा यांची भेट घेणार आहेत. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि शरद पवार यांच्यासोबतही ते बैठक घेण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री नितीश यांच्या विविध नेत्यांसोबतच्या भेटीचा संपूर्ण कार्यक्रम उघड झाला आहे.

या सर्व घडामोडीनंतर मोदी सरकारमध्ये डोकेदुखी वाढल्याचं दिल्लीतील पत्रकार सांगत आहेत. दुसरीकडे दिल्लीतील या घडामोड राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुद्धा उतरल्याने महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना बारामतीवर हेडलाईन मॅनेजमेंट करणारी वक्तव्य करण्याचे संदेश दिले गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे अस्तित्व नसलेल्या आणि डिपॉझिट जप्त झालेल्या बारामतीत जाऊन काही तरी कारणाने भेटी देऊन बातम्या होतील अशी वक्तव्य करण्याचे आदेश असल्याने त्याप्रमाणे भाजपच्या नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्षांपासून सर्वजण कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय. याचा काहीही परिणाम बारामतीत होणार नाही हे माहिती असूनही केवळ हेडलाईन मॅनेजमेंटचा भाजप नेत्यांचा प्रयत्न असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे शरद पवार विचलित होतील अशी गोड स्वप्नं भाजपच्या नेत्यांना पडली असावीत असा सुद्धा म्हटलं जातंय.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं जन्मगाव म्हणजे काटेवाडी. बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकून शरद पवार पहिल्यांदा संसदेत पोहोचले होते. गेली अनेक वर्ष बारामतीवरती पवार घराण्याचं निर्विवाद वर्चस्व आहे. सुप्रिया सुळे दोन वेळा लोकसभेवरती निवडूण गेल्या आहेत. अजित पवार बारामतीमधून आमदार आहेत. त्यामुळे याच काटेवाडीत राष्ट्रवादीला आव्हान देण्याचं भाजपनं ठरवलं आहे. शरद पवार ज्या मंदिरात नारळ फोडून आपल्या प्रचाराला सुरुवात करतात त्याच मंदिरात नारळ फोडून चंद्रशेखर बावनकुळे आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Loksabha Election 2022 Bihar CM Nitish Kumar will to Sharad Pawar in Delhi check details 06 September 2022.

हॅशटॅग्स

#Loksabha Election 2022(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x