12 December 2024 5:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON
x

Allu Arjun Video | अल्लू अर्जुनने मुलीसह गणपती बाप्पाला दिला निरोप, व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल

Allu Arjun Video Viral

Allu Arjun Video Viral | देशभरात गणेशोत्सव पहायला मिळत आहे. प्रत्येक घरा घरामध्ये गणेशाची धुम पाहायला मिळत आहे. सामान्यांपासून दिग्गजांपर्यंत सर्वांनी गणपती बाप्पाला आपल्या घरी आणले आहे. तसेच सिनेसृष्टीमधील सर्व दिग्गज घरांमधील गणपती आपल्याला पहायला मिळाले. कोणी दीड, तीन तर कोण पाच दिवसांनंत्तर बाप्पाला निरोप दिला आहे. असाच एक व्हिडीओ सिनेसृष्टीमधून समोर आला आहे. तो दुसरा तिसरा कोणी नसून पुष्पा फेम अल्लू अर्जून आहे. दक्षिण भारतीय सुपरस्टार अल्लू अर्जूनने 5 दिवसांच्या सेवेनंतर बाप्पाला निरोप दिला आहे. अल्लू अर्जून आणि त्याच्या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

‘गणपती बाप्पा मोरया’ अल्लू अर्जुन जोरदार जयजयकार करताना दिसला :
पुष्पा फेम अल्लू अर्जून 5 दिवसांच्या सेवेनंतर गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी आपल्या मुलीसोबत आला होता. त्यावेळी चाहत्यांनी त्याला चारही दिशेने घेरले यादरम्यानचा गणपती बाप्पाचा जोरदार जयजयकार करतानाचा व्हिडीओ अल्लू अर्जुनने आपल्या पर्सनल इंस्टाग्राम हॅडेलवरून शेअर केला आहे.यावेळी अल्लूची मुलगी त्याच्या कडेवर दिसून येत आहे आणि एका हातामध्ये गमपती बाप्पा दिसून येत आहे. बाप्पाला तो विसर्जन करणाऱ्या लोकांच्या हातामध्ये देते. यादरम्यान कलाकार एका हाताने नारळ फोडताना दिसतो त्यावेळी चाहते जोरजोरात ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करतात, आपल्या मुली सोबत याचा आनंद घेत अल्लू अर्जून सुद्धा ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयजयकार करतो. दरम्यान हा व्हिडीओला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चाहत्यांकडून पसंती मिळत आहे.

अल्लू अर्जुनच्या स्टाईलवर चाहते फिदा :
गणपती विसर्जनाला आलेल्या अल्लू अर्जुनच्या स्टाईलवर चाहते फिदा झाले आहेत. दरम्यान शेअर केलेल्या व्हिडीओला चाहते भरभरून पसंती दर्शवत आहेत आणि कमेंट मध्ये हार्ट फायर इमोटिकॉन्ससह आपल्या भवना व्यक्त करत आहेत. चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. अल्लू अर्जुन हिट ठरलेला पुष्पा चित्रपटाचा पुढील भाग म्हणजेच पुष्पा 2 चे शुटींग सध्या सुरु आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Allu Arjun Ganapati Visarjan Video Viral Checks details 6 September 2022.

हॅशटॅग्स

Allu Arjun Video Viral(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x