10 December 2024 7:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CIBIL Score | तुमच्याकडे सुद्धा एकापेक्षा अधिक पॅन कार्ड आहेत मग, तुमच्या क्रेडिट स्कोरवर होणार हा परिणाम - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगच्या वेळेत आणि नियमांमध्ये मोठा बदल; ही अपडेट ठाऊक आहे का Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, स्टॉक चार्टवर संकेत, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या Redmi Note 14 | Redmi Note 14 सिरीजची भारतात एंट्री; या तारखेपासून खरेदी करता येईल, किंमत आणि फीचर्स पाहून घ्या IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO BSNL Recharge | आता केवळ 58 रुपयांपासून मिळणार BSNL चे स्वस्तात स्वस्त प्लान; मोबाईल रिचार्जसाठी लक्षात ठेवा
x

Salman Khan | सलमान खानला पुन्हा जिवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना 2 कोटींच्या मागणीचा आला मेसेज - Marathi News

Salman Khan

Salman Khan | बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खान याच्या जीवनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सलमान खानला लगातार धमकीचे मेसेज येत आहेत. त्यामुळे त्याच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर बाबा सिद्दिकी यांच्या मृत्यूनंतर सलमानसाठी चांगली सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांना मिळाला मेसेज :
सलमान खान याला आतापर्यंत अनेकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्याचबरोबर त्याच्या वडिलांना देखील एका बागेमध्ये समोरासमोर येऊन एका व्यक्तीने धमकावलेलं आहे. दरम्यान आता मुंबई पोलिसांना आले या धमकीच्या फोनमध्ये 2 कोटी रुपये दिले नाहीत तर, सलमान खानला जीवे मारण्यात येईल. अशा पद्धतीचा मेसेज मुंबई पोलिसांना मिळाला आहे.

मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला आला मेसेज :
हा मेसेज मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षा मधील पोलिसांना करण्यात आला आहे. फोन केलेल्या व्यक्तीच्या विरोधात वरळी पोलीस ठाण्यात 354 (2), 308 (4) या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झिशान सिद्दिकी यांना धमकवणाऱ्या व्यक्तीला केलं अटक :
याआधी बऱ्याचदा सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली असून, झिशान सिद्दिकी यांना वांद्रे पूर्व येथील जनसंपर्क कार्यालयात जिवे मारण्याच्या धमकीचा फोन आला होता. दरम्यान त्यांना धमकवणाऱ्या व्यक्तीला नोएडा येथून अटक करण्यात आली आहे. सध्या सलमानला जीवे मारण्याच्या धमकीचा मेसेज पाठवलेल्या तरुणांचा पोलीस तपास करत आहेत. ही माहिती सलमानच्या चाहत्यांना मिळाल्यानंतर समस्त चाहतावर्ग पुन्हा एकदा टेन्शनमध्ये आला आहे.

Latest Marathi News | Salman Khan 30 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Salman Khan(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x