12 December 2024 12:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON
x

Aindrila Sharma Death | अभिनेत्री आंद्रिला शर्मा कमी वयात जग सोडून गेली, हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Aindrila Sharma Death

Aindrila Sharma Death | मनोरंजन विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. बंगाली सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अँड्रीला शर्मा आता या जगात नाही. एकाधिक हृदयविकाराच्या झटक्याने २० नोव्हेंबर रोजी या अभिनेत्रीचा मृत्यू झाला. ही बातमी समोर येताच चित्रपट विश्वात शोककळा पसरली आहे. इतक्या कमी वयात ही अभिनेत्री जग सोडून गेल्याचे ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.

ब्रेन स्ट्रोकमुळे रुग्णालयात दाखल
अँड्रीला बऱ्याच दिवसांपासून आजारी होती. १ नोव्हेंबरच्या रात्री ब्रेन स्ट्रोकमुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे ती सुमारे 19 दिवस आयुष्यासाठी लढत होती, परंतु त्यानंतर शनिवारी संध्याकाळी अभिनेत्रीला अचानक अनेक हार्ट अटॅक आले, ज्यामुळे तिची प्रकृती बिघडली. तिच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी चाहते सतत प्रार्थना करत होते, पण आज अँड्रीला मृत्यूशी लढाई हरली. रविवारी दुपारी एकच्या सुमारास तिने अखेरचा श्वास घेतला.

दोनदा कॅन्सरवर मात केली
या आधी या अभिनेत्रीने दोनदा कॅन्सरवर मात केली होती. दुसऱ्यांदा कॅन्सर झाल्याचे निदान झाल्यावर त्यांनी क्रिटिकल सर्जरी पूर्ण केली. त्या दरम्यान, तिने केमोथेरपी सेशन्स घेतली आणि नंतर डॉक्टरांनी ती पूर्णपणे बरे झाल्याचे सांगितले. आता वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी तिच्या जाण्याने अभिनेत्रीच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एंड्रीलाच्या निधनाबद्दल ऐकून तिचे चाहते आणि कोस्टारही सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत.

अँड्रीला शर्माच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर टीव्ही ते ओटीटी या दुनियेत तिनं वेगळी ओळख निर्माण केली. छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात करणाऱ्या या अभिनेत्रीने अनेक लोकप्रिय शोमध्ये मुख्य भूमिका साकारली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Aindrila Sharma Death after suffering multiple cardiac arrests check details on 20 November 2022.

हॅशटॅग्स

#Aindrila Sharma Death(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x