28 June 2022 11:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
एकनाथ शिंदेंनी बंडखोर आमदारांना या 'गेम प्लॅन' पासून ठेवलंय अंधारात | शिंदे आणि भाजपचा गेम प्लॅन बाहेर येतोय Multibagger Penny Stocks | हा 3 रुपयांचा पेनी शेअर करतोय मालामाल | आजही खरेदीला खूप स्वस्त Inflation Effect | पीठानंतर आता तांदूळ अजून महागणार आहे | तुमच्या किचनचा खर्च वाढणार Multibagger Stocks | तुम्ही सुद्धा असे शेअर निवडा | या शेअरने फक्त 10 महिन्यात 960 टक्के परतावा दिला Demat Deactivated | तुमचे डीमॅट खाते डिऍक्टिव्हेट होईल | फक्त 3 दिवस उरले | हे काम लवकर करा PPF Investment | मुलाच्या नावेही उघडता येईल पीपीएफ खाते | फायद्याच्या योजनेबद्दल जाणून घ्या New Labour Codes | तुम्ही 1 वर्ष नोकरी केल्यानंतरही मिळणार ग्रॅच्युइटीचे पैसे | पैशाचं गणित जाणून घ्या
x

सुशांत प्रकरणाचा तपास CBI मार्फत होणार, बिहार सरकारची शिफारस केंद्राकडून मान्य

Bollywood Sushant Singh Rajput, death case, Bihar government, CBI investigation

अयोध्या, ५ ऑगस्ट : मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला आता पुन्हा नवं वळण मिळालं आहे. सुशांत सिंहच्या तपासावरून मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यात आरोप सुरू असून, बिहार सरकार या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची शिफारस केली होती.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पोलीस महासंचालकांनी सुशांतच्या वडिलांशी चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी सीबीआय तपासाची मागणी केली होती. त्यामुळं आता आम्ही या प्रकरणी सीबीआय चौकशीची शिफारस करत आहोत असं म्हटलं होतं.’

सुशांत सिंहच्या आत्महत्येचा तपास सीबीआयमार्फत करावा अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. यानंतर आज सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणी केंद्र सरकारचे वकील महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं की, या प्रकरणाचा सीबीआय तपास करावा ही बिहार सरकारची शिफारस मान्य करण्यात आली आहे.

दरम्यान सुशांतच्या मृत्यूप्रकरणाचा तपास करण्यास मुंबई पोलीस सक्षम असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख वारंवार सांगत होते. त्यादरम्यानच पाटण्यात सुशांतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर बिहार मुंबईत पोहोचले आणि चौकशी करण्यास सुरुवात केली. यावरुन मुंबई पोलीस आणि बिहार पोलिसात संघर्षही झाला होता. अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. पाटण्याचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने क्वॉरन्टाईन केल्याने हा संघर्ष शिगेला पोहोचला. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 59 जणांचा जबाब नोंदवला आहे.

 

News English Summary: Advocate General of the Union Government Tushar Mehta, who was present in the Supreme Court today, said that the Bihar government’s recommendation that the matter be investigated by the CBI has been accepted.

News English Title: Bollywood Sushant Singh Rajput death case central govt has accepted Bihar government recommendation for CBI investigation News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x