17 April 2021 2:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
कडक संचारबंदीत लोक शिवथाळी खायला जाणार कसे? | पण शिवथाळीसाठी गर्दी | राम कदम तोंडघशी Alert | हवेतून वेगाने पसरतो कोरोना, 3 देशांतील तज्ञांना याचा ठोस पुरावा सापडला - लँसेट जर्नल १९-२० एप्रिल नंतर रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होईल - डॉ. राजेंद्र शिंगणे Alert | एकूण रुग्णांपैकी 10% रुग्ण 11 ते 19 वयोगटातील तर 4.42% रुग्ण 10 वर्षांपेक्षा कमी वयाचे केंद्राची कोविड रणनीती, पहिला टप्पा लॉकडाउन, दुसरा टप्पा घंटी वाजवणे, तिसरा टप्पा देवाचे गुण गा प्रेतं जळत होती तेव्हा साहेब निवडणुकीत 'जुमलेबाजी' करत होते... इतिहास साक्ष देईल - काँग्रेस महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात प्रचार करून भाजप मराठी भाषिकांसोबत नाही हे सिद्ध झाले आहे
x

जनता गॅस वर, अनुदानित-विनाअनुदानित सिलेंडरचे दर वाढले

मुंबई : आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा भडका उडाला असताना आता अनुदानित व विनाअनुदानित सिलेंडरचे दर वाढले आहेत. देशभरातील ८१ टक्के कुटुंबं हे सिलेंडरचा वापर करतात. त्यामुळे या सिलेंडर दरवाढीचा फटका देशातील कोट्यवधी लोकांना बसणार आहे. अनुदानित सिलेंडरचा दर ४८ रुपयांनी, तर विनाअनुदानित सिलेंडरचा दर २ रुपये ३४ पैसे असा वधारला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

देशभरात झालेल्या सिलेंडरच्या दर वाढीमुळे आता अनुदानित सिलेंडरसाठी मुंबईत ४९१.३१ रुपये मोजावे लागतील. तर राजधानी दिल्लीत अनुदानित सिलेंडरची किंमत ४९३.५५ रुपये इतकी होईल. याशिवाय अनुदानित सिलेंडरसाठी कोलकात्यात ४९६.६५ रुपये, चेन्नईत ४८१.८४ रुपये ग्राहकाला मोजावे लागतील. दुसरीकडे मुंबईत विनाअनुदानित सिलेंडरसाठी ४८.५० रुपये अधिक द्यावे लागतील. मुंबईत विनाअनुदानित सिलेंडर ६७१.५० रुपयांना मिळेल. तर विनाअनुदानित सिलेंडरसाठी दिल्लीत ६९८.५० रुपये, कोलकात्यात ७२३.५० रुपये, चेन्नईत ७१२.५० रुपये मोजण्याची तयारी ठेवावी लागेल.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1483)BJP(437)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x