4 August 2020 1:15 PM
अँप डाउनलोड

युपीमध्ये भाजपचे 'बुरे-दिन' आल्याचं आकडेवारी सांगते ?

लखनऊ : केंद्रात कोण सत्तेत बसणार हे उत्तर प्रदेशातील आकड्यावर बऱ्यापैकी अवलंबून असत. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या एकूण ८० जागा आहेत. २०१४ मधील निवडणुकीचा निकाल लक्षात घेतल्यास भाजपला सर्वाधिक म्हणजे ७१ जागा असं अभूतपूर्व यश मिळालं होत. परंतु मागील पोटनिवडणुकीची आकडेवारी म्हणजे गोरखपूर आणि फुलपूर आणि त्यानंतर कालच्या कैराना लोकसभा पोटनिवडणुकीत आरएलडी’ने भाजपला अक्षरशः धूळ चारली आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

त्यामुळे पोटनिवडणुकीनंतर भाजपसाठी देशभरात आणि मुख्य म्हणजे उत्तर प्रदेशात परिस्थिती बरीच बदलल्याचे चित्र आहे. कारण एका खाजगी वृत्त वाहिनीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार जर आज लोकसभा निवडणुका झाल्या तर उत्तर प्रदेशात भाजपला एकूण ८० जागां पैकी केवळ १९ जागा मिळतील.

त्यामुळे उत्तर प्रदेशातील सध्याची मतदानाची आकडेवारी लक्ष्यात घेतल्यास ते भाजपसाठी बुरे दिन असल्याचं सिद्ध करत. कारण मतदानाची आकडेवारी पाहता सपा आणि बसपाला मिळून ४६ टक्के इतकी मतं मिळाली आहेत. तर दुसरीकडे संपूर्ण एनडीएला ६५ टक्के इतकी मतं मिळाली आहेत. त्यात सर्वांची आकडेवारी समोर घेतल्यास काँग्रेस १२ टक्के व इतर पक्षांचा ३ टक्के हा आकडा लक्षात घेतल्यास ती बेरीज थेट ६० टक्क्यांवर जाते.

त्यामुळे नवीन आकडेवारीनुसार आणि मागील ४ वर्षातील भाजपच्या मतांमध्ये ८ टक्के इतकी घट झाली आहे. मात्र सर्व विरोधक एकत्र येत असल्याने भाजपच्या मतांमध्ये लक्षणीय घट होताना दिसत आहे. त्यामुळे आजच्या आकडेवारीनुसार जर आज निवडणुका झाल्या तर उत्तर प्रदेशात भाजपला केवळ १९ जागा मिळतील तर विरोधकांना तब्बल ६१ जागांवर विजय संपादित करता येईल.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x