13 May 2021 3:14 AM
अँप डाउनलोड

फिर से, खोदा पहाड आैर निकला उद्धव: नितेश राणें

मुंबई : पालघर लोकसभा निवडणुकीतील शिवसनेच्या पराभवानंतर मातोश्रीवर तातडीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच सर्वत्र ब्रेकिंग न्यूज येऊ लागल्या की शिवसेना पक्ष प्रमुख आता मोठा निर्णय घेणार आणि सत्तेतून बाहेर पडणार व मोठा राजकीय भूकंप होणार.

BhagyaVivah Marathi Matrimonial

परंतु पत्रकार परिषद संपली आणि ती बातमी म्हणजे एक फुसका बार निघाली अशी चर्चा रंगली. सत्तेतून बाहेर पडणं सोडा उद्धव ठाकरे यांनी त्या विषयाला साधा स्पर्श सुद्धा केला नाही पूर्ण पत्रकार परिषदेत. उलट पत्रकारांनी त्या संबंधित प्रश्न विचारताच त्याला पद्धतशीर बगल देऊन पत्रकार परिषद आटोपती घेण्यात आली.

नेमका त्याचाच धागा पकडत आता आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडविणार ३१ मे रोजी एक ट्विट केलं आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर एकच हशा पिकली आहे. आमदार नितेश राणे यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे की,’खोदा पहाड..आैर निकला..उद्धव..आज फिर से!! म्हणे मोठी घोषणा ५ वाजता!!

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(81)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x