2 May 2024 6:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री अनिल देशमुख

Lockdown, Corona Crisis, Covid 19, Home Minister Anil Deshmukh

जळगाव, २९ एप्रिल : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आणीबाणीच्या विधानाचा गृह मंत्री अनिल देशमुख यांनी खरपूस समाचार घेतला आहे. राज्याचं पाच वर्षं नेतृत्व केलेल्या व्यक्तीने अशा पद्धतीनेटीका करणे अयोग्य असून, आपत्तीच्या वेळी राजकारण करणे योग्य नसल्याचे अनिल देशमुख म्हणाले.

कोरोनाच्या संकटकाळात देवेंद्र फडणवीस रस्त्यावर दिसण्यापेक्षा राजभवनात जास्त दिसतात. सध्याच्या परिस्थितीत राजकारण न करता, सर्व पक्षाच्या नेत्यांनी सहकार्य केलं पाहिजे, असा जोरदार टोला देशमुख यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात आणीबाणीसदृश परिस्थिती असल्याची टीका राज्यपालांची भेट घेऊन केली होती. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते जळगावात बोलत होते.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी डॉक्टरांपासून ते पोलिसांपर्यंत सर्वजण दिवस-रात्रं मेहनत करत आहेत. याच कोरोना योध्दांवर हल्ले करण्यात येत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. कोरोना योद्धांवरील हल्ले यापुढे खपवून घेणार नाही, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खडसावून सांगितले आहे.

गृहमंत्र्यांनी ट्विटरवर एक पोस्ट करत सांगितले की, महाराष्ट्रात पोलिसांवर काही ठिकाणी हल्ले झाले आहेत. पोलिसांवरचा हल्ला राज्य शासन सहन करणार नाही. ज्या ज्या ठिकाणी पोलिस, डॉक्टर आणि आरोग्य यंत्रणेवर जे दिवस-रात्रं काम करत आहेत. त्याच्यावर हल्ला होईल तिथे पोलिसांच्या माध्यमातून कठोर शासन केले जाईल.

 

News English Summary: The government has announced a lockdown in view of the growing prevalence of corona. Everyone from doctors to police are working day and night to stop the growing corona infection. Incidents of attacks on these same Corona warriors are frequent. Home Minister Anil Deshmukh has slammed the attacks on Corona fighters.

News English Title: Story Lockdown home ministers Anil Deshmukh says corona with the police will not tolerate attacks on warriors News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x