24 April 2024 3:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअर सहित हे 5 शेअर्स खिसे भरणार, 44 टक्केपर्यंत परतावा सहज मिळेल GTL Share Price | मालामाल करणार स्वस्त GTL शेअर! देईल 200 टक्के परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या
x

४० कोटी भारतीयांना कोरोना होणार ती बातमी खोटी..असा कोणताही रिपोर्ट नाही..सत्य वाचा

Covid 19, Corona Crisis, John Hocking University Report

मुंबई, २९ मार्च: सध्या केवळ देशात नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना आपत्तीमुळे भीतीचं वातावरण आहे. अशा वातावरणात त्या त्या देशातील अथवा राज्यातील तसेच जागतिक आरोग्य संघटना वेळोवेळो अधिकुत माहिती देऊन लोकांमध्ये जनजागृती करून त्यांचा आत्मविश्वास वाढवत आहेत. कारण सध्याच्या परिस्थितीत तोच उपलब्ध असलेला पर्याय आहे.

भारतात तसेच अनेक विकसित देशांमध्ये COVID १९ संदर्भातील चाचणी लवकरात लवकर करता यावी यासाठी टेस्ट किट देखील बनविण्यात आल्या आहेत आणि अनेकांनी कोरोनावर लस देखील विकसित केली असून त्यासंदर्भातील चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत. मात्र एकूण जगाची लोकसंख्या आणि त्याला जगभरातून गरजेच्या असणाऱ्या मान्यता हा खूप वेळकाडू गोष्टी आहेत. त्यामुळे या गरजेच्या किट्स आणि लस यांचं उत्पादन जगभरात पोहोचण्यासाठी काही महिने वर्ष देखील लागतील. मात्र सध्याच्या परिस्थितीत गरजेच्या असणाऱ्या व्हेंटीलेटर आणि इतर वैद्यकीय साहित्य संपूर्ण जगाची प्रथम गरज आहे.

मात्र तत्पूर्वी लोकांपर्यंत खऱ्या आणि अधिकृत बातम्या पोहोचविण्याच्या कर्तव्यावरून अनेक मीडिया संस्था भरकटल्याचं पाहायला मिळत आहे. कोणतीही शहानिशा ना करता अत्यंत भीषण बातम्या या तणावाच्या वातावरणात प्रसिद्ध करत असल्याने चिंता वाढली असून, त्यामुळे ‘मानसिक कोरोनाची’ लागण देशभर होऊ शकते याचा देखील त्यांना विसर पडल्याचं दिसतं आहे.

अनेक मीडिया संस्थानी एक न्यूज रिपोर्ट प्रकाशीत केली आहे. त्यात असा दावा करण्यात आला आहे की, भारतात करोना व्हायरस खूप वेगाने पसरत आहे. कमीत कमी ४० कोटी भारतीय लोकांना करोनाचा संसर्ग होईल. या मीडिया रिपोर्टमधील दावा सेंटर फॉर डिसीज डायनॅमिक्स, इकोनॉमिक्स अँड पॉलिसी (CDDEP) जॉन हाँकीन्स विद्यापीठाच्या रिपोर्टच्या आधारवर केला आहे असं म्हटलं होतं.

मात्र जागृत माध्यमांनी केलेल्या पडताळणीत जॉन हाँकीन्स विद्यापीठाने स्वतः हा रिपोर्ट नाकारला आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हँडल अकाउंटवरून विद्यापीठाने ट्विट केले आहे की, ज्या (CDDEP) जॉन हाँकीन्स रिपोर्टचा दाखला देवून मीडिया संस्थाने बातम्या लिहिल्या आहेत. त्या बातम्यांसाठी आपल्या लोगोचा वापर करू नये, असे सांगितल्याने त्या दाव्याची पोलखोल झाली आहे.

या स्पष्टीकरणानंतर काही मीडिया संस्थांनी आपल्या बातम्या काढून टाकल्या आहेत. दरम्यान, काही मीडिया संस्थांनी आपल्या बातम्या अजूनही हटवल्या नाहीत. तसेच त्यात काही बदलही केलेला नाही. कारण जॉन हाँकीन्स विद्यापीठाच्या लोगोसोबत एक खोटा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. या रिपोर्टच्या आधारावर अनेक मीडिया संस्थांनी आपल्या बातम्या छापल्या आहेत की, भारतात जवळपास ४० कोटी भारतीयांना करोना संसर्ग होईल. मात्र ते वृत्त पूर्णपणे खोटं असल्याने भारतीयांनी अजिबात घाबरण्याची गरज नसून, केवळ सरकारच्या सूचनांचं पालन करावं आणि त्यांना सहकार्य करावं हाच सोपा उपाय आहे.

 

News English Summary: However, many media organizations are seeing a shift in their duty of delivering real and official news to people in the past. They are also forgetting that the ‘horrible’ coronary infection can be spread across the country as the horrific news releases in this tense environment without any justification. The news media has released a news report. It claims that the Corona virus is spreading rapidly in India. At least 2 million Indians will get coronary infection. The claim in this media report was made on the basis of a report by the Center for Disease Dynamics, Economics and Policy (CDDEP) John Hawkins University. John Hawkins University, however, has denied the report itself in a scrutiny by the media. The university has tweeted from its official Twitter handle account that the media has written the news, citing the John Hawkins report (CDDEP). Claiming that you should not use your logo for the news has led to the claim.

 

News English Title: Story fake alert media reports claim 40 crore -Indians will contract Covid 19 falsely attribute it to John Hopkins University News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x